mumbai crime news : मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील शिवाजीनगरमधील आहे. येथे एका १९ वर्षीय महिलेवर चौघांनी बलात्कार केला आहे. ही घटना शनिवारी (२३ जानेवारी) पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. चारपैकी तीन आरोपींना शनिवारीच अटक करण्यात आली. चौथ्या आरोपीला आज (रविवार, 23 जानेवारी) अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी ही माहिती दिली आहे. Gang-rape of 19-year-old woman in Mumbai Shivajinagar, four accused arrested mumbai crime news
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईतील शिवाजीनगरमधील आहे. येथे एका १९ वर्षीय महिलेवर चौघांनी बलात्कार केला आहे. ही घटना शनिवारी (२३ जानेवारी) पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. चारपैकी तीन आरोपींना शनिवारीच अटक करण्यात आली. चौथ्या आरोपीला आज (रविवार, 23 जानेवारी) अटक करण्यात आली. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी ही माहिती दिली आहे.
Mumbai, Shivaji Nagar Gang rape | All four accused including two minors have been arrested: Arjun Rajane, Senior Police Inspector, Shivaji Nagar PS https://t.co/ozxlrCacTm — ANI (@ANI) January 23, 2022
Mumbai, Shivaji Nagar Gang rape | All four accused including two minors have been arrested: Arjun Rajane, Senior Police Inspector, Shivaji Nagar PS https://t.co/ozxlrCacTm
— ANI (@ANI) January 23, 2022
पीडित महिला केटरिंगचे काम करते. ती शनिवारी सकाळी शिवाजी नगर येथील बैगनवाडी जुना बस डेपो येथून आपल्या घरी जात होती. चार आरोपींपैकी एक आरोपी महिलेला ओळखत होता. जुन्या बस डेपोजवळ आधीच उभ्या असलेल्या आरोपीने संबंधित महिलेला थांबवून विचारले की, यावेळी कोठून येत आहे? आपण कामावरून घरी जात असल्याचे महिलेने सांगितल्यावर त्याने काही कामाबाबत तिच्याशी बोलायचे असल्याचे सांगितले. असे म्हणत तो महिलेला जवळच असलेल्या रिकाम्या झोपडीत घेऊन गेला. तेथे आणखी तीन जण आले. या चौघांनी मिळून या महिलेवर बलात्कार केला.
या घटनेनंतर चारही आरोपी तेथून पळून गेले. पीडितेने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनवरून ही माहिती दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७६, ३७६-डी लावून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी घडलेल्या चारपैकी तीन आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली. चार आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत.
पीडितेने पोलिसांना हकिगत सांगितली. पीडितेने सांगितले की, बलात्काराच्या वेळी तिने स्वत:ची सुटका करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र एका आरोपीने तिचे तोंड हाताने दाबले होते. यातील दोन आरोपी उत्तर प्रदेशला जाणारी ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले.
Gang-rape of 19-year-old woman in Mumbai Shivajinagar, four accused arrested mumbai crime news
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App