नबाब मलिक पुन्हा अडचणीत, आता चांदीवाल आयोगाने बजावले समन्स


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बेफाट वक्तव्य करणारे राज्याचे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. अ‍ॅँटेलिया प्रकरणात चांदीवाल आयोगाने त्यांना समन्स बजावले आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आयोगाने नवाब मलिक यांना समन्स पाठवले आहे.Fwd: Nabab Malik in trouble again, now summoned by Chandiwal Commission

अँटिलिया प्रकरणामागे सचिन वाझे आणि परमबीर सिंह असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर आपली प्रतिमा खराब होत असल्याचे सचिन वाझेने म्हटले होते. त्यानंतर आता चांदीवाल आयोगाकडून मलिकांकडे विचारणा करण्यात येणार आहे.बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर नवाब मलिकांनी अँटिलिया प्रकरणामागे मी आणि परमबीर सिंह असल्याचे म्हटले आहे. अशा वक्तव्यामुळे प्रतिमा खराब होत आहे असा आरोप केला आहे. त्यामुळे आयोगाने त्यांना समन्स बजावून चौकशी करावी. त्यामुळे ते कोणत्या आधारावर आरोप करत आहे हे स्पष्ट होईल अशी मागणी सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर केली आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीजवळ एका गाडीमध्ये स्फोटके सापडली होती. गाडीमध्ये २० जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे एक पत्र सापडले होते. त्यानंतर ५ मार्च रोजी या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.

अँटिलिया स्फोटके प्रकरणात मुंबई पोलिसातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचेही नाव आहे. या प्रकरणाच्या वेळी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे होते. यानंतर मार्चमध्ये परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाºयांवर मुंबईतील बार, रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता.

Fwd: Nabab Malik in trouble again, now summoned by Chandiwal Commission

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी