नितेश राणे यांना अडकविण्याची पूर्ण तयारी, संतोष परब यांनी हल्लाप्रकरणी घेतले नाव


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करणारे भारतीय जनता पक्षाचेआमदार नितेश राणे यांना अडकविण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांनी नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.Fully prepared to implicate Nitesh Rane, Santosh Parab took the name in the attack case

सावंत यांनी म्हटले आहे की, रात्री साधारण अकरा वाजता आपण नरडवा दिठा इथं मुलाची वाट पाहत उभे होतो, माझा मुलगा आंबोलीवरुन येणार होता. आंबोलीवरुन आलेल्या माझ्या मुलाची बॅग मोठी असल्याने त्याला रिक्षात बसवलं आणि रिक्षाच्या मागून आपण दुचाकीवरुन जात होतो.त्याचवेळी वेगाने आलेल्या एका गाडीने आपल्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की आपण दुचाकीवरुन 10 ते 15 फूट लांब उडालो. ही इनोव्हा गाडी होती आणि त्याला नंबर प्लेट नव्हती, त्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीने जवळ येत धमकी दिली.

तू सतीश सावंतचं काम करतोस ना, बघतोच तुला असं सांगत त्या व्यक्तीने खिशातून धारदार शस्त्र काढलं आणि ते त्याने आपल्या मानेवर मारण्याचा प्रयत्न केला. मानेवरचा वार चुकला पण छातीवर त्याने दोन वार केले. यानंतर त्याने गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना ही गोष्ट कळवायला हवी असं सांगत खिशातला मोबाईल काढून कुणाशी तरी बोलला. त्यानंतर तो इनोव्हा गाडीत बसून निघून गेला.

त्या व्यक्तीने घेतलेल्या नावांवरुन आपण पोलीस स्थानकात तक्रार दिली. गेल्या विधानसभेपासून नितेश राणे आणि गोट्या सावंत माज्या आणि सतिश सावंत यांच्या विरोधात आहेत. आमच्या विरोधात त्यांची षडयंत्र सुरुच आहेत. कालपर्यंत ते बोलत होते की आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, मला यात गोवण्यात येत आहे,

मग पोलीस तपासाला योग्य सहकार्य करुन तपासणीला जायला हवं, घाबरण्याची गरज नाही. ज्या अर्थी हे अटकपूर्व जामीन मागतायत, त्या अर्थी हेच सूत्रधार आहेत.दरम्यान, या प्रकरणी नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

Fully prepared to implicate Nitesh Rane, Santosh Parab took the name in the attack case

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती