पार्किंग, सॅनिटायझेशनच्या नावाखाली आरटीओत लूट; ठाणे व कल्याणमध्ये लाखो रुपयांची वसुली


विशेष प्रतिनिधी

ठाणे / कल्याण : ठाणे आणि कल्याण येथील आरटीओमध्ये पसिंगसाठी येणाऱ्या वाहनचालकाकडून वाहन पार्कींगसाठी 100 रुपये आणि सॅनिटायझेशनच्या नावाखाली 100 रुपये उकळले जात आहेत. अशा प्रकारे दिवसाला लाखो रुपयांची जबरदस्तीने वसुली केली जात आहे.
राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आरटीओचे स्टीग ऑपरेशन करून ही बाब चव्हाट्यावर आणली आणि कल्याण आरटीओ मुख्यालयात या गैरकारभाराला वाचा फोडली आहे. For vechiel Parking, sanitation collecting 200 hundred Ruppes in kalyan and Thaane RTO

महिन्याला सहा हजार पेक्षा अधिक गाड्या पासिंगला येतात. प्रत्येकी 200 रुपये पकडले तरी बारा लाख पेक्षा अधिक रुपयांची वसुली एका महिन्यात केली जात आहे. याबाबत राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्या लकडे तक्रार असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अवैध वसुली करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र धाडले आहे.

  • पासिंगच्या वाहन पार्कींगसाठी 100 रुपये
  • सॅनिटायझेशनच्या नावाखाली 100 रुपये उकळतात
  • दिवसाला लाखो रुपयांची जबरदस्तीने वसुली
  • राष्ट्र कल्याण पार्टीकडून स्टिंग ऑपरेशन
  • कल्याण आरटीओत गैरकारभाराला वाचा फोडली
  • अवैध वसुली करणाऱ्या विरोधात आता गुन्हा दाखल

For vechiel Parking, sanitation collecting 200 hundred Ruppes in kalyan and Thaane RTO

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण