विशेष प्रतिनिधी
मुंबई : दोन दिवसांपूर्वीचं परळीतील वैद्यनाथ मंदिराला आरडीएक्सने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. आता वैद्यनाथ मंदिरानंतर अंबेजोगाई मातेच्या मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अंबेजोगाई येथील योगेश्वरी माता मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे पत्र आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ट्रस्टचे सचिव अॅडव्होकेट शरद लोमटे यांच्या फिर्यादीवरून अंबेजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी बॉम्बशोधक पथकाने परिसरात शोध घेतला. श्वानपथकांचा वापर करून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Following Parli Vaidyanath, now RDX threatens to blow up Ambejogai temple; Crime filed, search launched
याआधी परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवण्याच्या धमक्या आल्या होत्या. धमकीच्या पत्रात ५० लाखांची मागणी करण्यात आली होती. पैसे न मिळाल्यास मंदिर आरडीएक्सने उडवू, असे पत्रात लिहिले होते. बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे पत्र पाठवणारे आरोपी नांदेडचे असून, अंबाजोगाई येथील योगेश्वरी माता मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे पत्र पाठवणारे आरोपीही नांदेड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असणारे परळीतील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. परळी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे असणारे हे परळीतील वैद्यनाथ मंदिर या देवस्थानात सध्या खूप पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे 50 लाख द्या अन्यथा मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची, धमकी पत्राद्वारे या देवस्थानाला दोन दिवसांपूर्वी देण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App