यूपी सरकारला “बैल” म्हणून घेतलेत; पण योगींच्या बुलडोझरची भीती अखिलेशना का वाटते??


उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रतापगड मध्ये पत्रकारांशी बोलताना उत्तर प्रदेश सरकारला “बैल” असे संबोधून घेतले. राजकारणामध्ये अशी टीका टिप्पणी चालायचीच तिच्या औचित्य आणि अनौचित्य यात शिरण्यापेक्षा अखिलेश यादव यांनी त्याच्या पुढचे विधान केले आहे ना, त्यामध्ये जास्त राजकीय अर्थ दडलेला आहे. तो पाहिला पाहिजे. अखिलेश यादव म्हणाले, की उत्तर प्रदेशात बुल आणि बुलडोझर घालवण्यासाठी समाजवादी पक्षाचे सरकार आणले पाहिजे. यातला बुल म्हणजे बैल हे योगी सरकारच्या मंत्र्यांना त्यांनी उद्देशून वापरलेले शब्द आहेत. अखिलेश यादव यांच्या मते उत्तर प्रदेश सरकारमध्ये जुनाट लोक भरले आहेत त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची काही माहिती नाही. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लॅपटॉप आणि मोबाईल चालवता येत नाहीत. अर्थात हा अखिलेश यांचा दावा आहे. राजकीय टीका म्हणून त्याकडे पाहून सोडून देता येऊ शकते. Took the UP government as a “bull”; But why is Akhileshna afraid of yogi’s bulldozer ??

परंतु अखिलेश यादव पुढे जे म्हणालेत की की बुलडोझर घालविण्यासाठी समाजवादी सरकार आणायचे आहे. याचा नेमका अर्थ काय…?? अखिलेश यादव यांना कोणता बुलडोझर उत्तर प्रदेशातून घालवायचा आहे?? बुलडोझर ही काही भीतीदायक गोष्ट आहे का?? उत्तर प्रदेशात बुलडोझरने काही बेकायदेशीर कारवाया केल्या आहेत का की ज्या बुलडोझरला घालवण्याची भाषा अखिलेश यादव एवढ्या मोठ्याने करत आहे?? खरे कारण काय आहे…??

खरे म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांना योगी आदित्यनाथ यांनी चालविलेल्या बुलडोझरची भीती वाटत आहे…!! हे बुलडोझर गेल्या चार वर्षांमध्ये योगींनी उत्तर प्रदेश मधील कुविख्यात गुंड – माफिया यांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर चालवले आहेत. त्यामागे भक्कम कायदेशीर आधार आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशानुसारच उत्तर प्रदेश सरकारने पूर्वांचल मधील गुंड – माफिया अतिक अहमद, मुख्तार अन्सारी आणि त्यांनी पोसलेल्या अनेक गुंड – माफियांच्या बेकायदा मालमत्ता, हॉटेल्स, महाल हे बुलडोझर लावून उद्ध्वस्त केले आहेत. या गुंड – माफियांनी अनेक गरिबांच्या जमिनी लाटल्या होत्या, त्या जमिनी सरकार जमा केल्या आहेत. तब्बल 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेकायदेशीर मालमत्ता योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एकतर जप्त केल्या आहेत किंवा उद्ध्वस्त केल्या आहेत. मीरत मधल्या भंगार माफियांच्या तथाकथित साम्राज्यावर देखील योगी आदित्यनाथ सरकारने बुलडोझर चालविला आहे.



… आणि नेमके इथेच अखिलेश यादव यांचे राजकीय दुखणे जडलेले दिसते आहे. अतीक अहमद, मुख्तार अन्सारी आणि अन्य गुंड – माफिया हे कधी ना कधीतरी समाजवादी पक्षाचे आमदार – खासदार राहिले आहेत. त्यांनी पक्ष अनेक बदलले आहेत, पण त्यांचे लागेबांधे समाजवादी पक्षाशी जुने राहिले आहेत. पूर्वांचल परिसरात समाजवादी पक्षाचा राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी मुलायमसिंह यादव यांनी या गुंड – माफियांचा 1990 च्या दशकापासून वापर केला आहे. या गुंड – माफियांच्या मालमत्तांवर बुलडोझर चावलणे तसेच त्यांना तुरुंगात पोहोचवणे हे एक प्रकारे समाजवादी पक्षाचे राजकीय जाळेच उखडून टाकणे आहे आणि म्हणूनच अखिलेश यादव यांना बुल म्हणजे बैल आणि बुलडोझर उत्तर प्रदेशातून घालविण्यासाठी समाजवादी पक्षाचे राज्य आणायचे आहे…!!

आधीच्या समाजवादी पक्षाच्या राजवटीत

याच गुंड – माफियांनी आपली दहशत पसरवून संपत्ती गोळा केली. या संपत्तीच्या आधारे समाजवादी पक्षाचे अनेक स्थानिक नेते पोसले. आज तिथे समाजवादी पक्षाच्या नेत्यांना “आर्थिक टंचाईचा” सामना करावा लागतो आहे. अशा स्थितीत समाजवादी पक्ष निवडणूक कशी लढवणार?? त्यांची पारंपारिक YM यादव – मुस्लिम वोट बँक पुन्हा कशी बांधणार?? ही अखिलेश यादव यांना चिंता आहे आणि म्हणूनच त्यांना बुल आणि बुलडोझर यांना उत्तर प्रदेश यामधून हद्दपार करायचे आहेत.

योगी आदित्यनाथ सरकारला बैल म्हणून घेतले. त्यांच्यावर अशिक्षित असल्याचा ठपका लावला की आपले काम सोपे होईल, असा अखिलेश यादव यांचा होरा आहे. पण त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार चालविलेले बुलडोझर थांबण्याची शक्यता नाही. उध्वस्त झालेल्या मालमत्ता पुन्हा उभ्या करता येण्याची शक्यता नाही. समाजवादी पक्षाचे सरकार आले तरी हे शक्य नाही. हे अखिलेश यादव लक्षात घेताना दिसत नाहीत. त्यामुळेच एक पोकळ राजकी़य टीका या पलिकडे त्यांच्या बुल आणि बुलडोझर या वक्तव्याला फारसे महत्त्व उरत नाही…!!

Took the UP government as a “bull”; But why is Akhileshna afraid of yogi’s bulldozer ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात