Pimpari MLA Anna Bansode : पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. Firing on Pimpari MLA Anna Bansode in His Office Near Chinchwad Station Today
विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबाराची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने आमदार बनसोडे यांच्या कार्यालयाच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
याप्रकरणी पोलिसांनी तानाजी पवार या संशयिताला ताब्यात घेतले आहे. तानाजी पवार यानेच पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून शस्त्रदेखील जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Firing on Pimpari MLA Anna Bansode in His Office Near Chinchwad Station Today
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App