दोन मुलांचा लागोपाठ मृत्यू झाल्याने विरह सहन न होऊन पित्याची आत्महत्या

विशेष प्रतिनिधी

पुणे : एका पाठोपाठ एक अशा दोन्ही मुलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला.  विरह सहन न झाल्याने वडिलांनी देखील गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सिंहगड रोड परिसरातील नांदेड फाटा येथे घडली.Father commits suicide after death of two children in a row

लिसानी दिलेल्या माहितीनुसार, संजीव कदम (वय 40) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संजीव यांचा एक मुलगा आणि मुलीचं आजारपणामुळे निधन झालं होतं. संजीव कदम यांचा मुलगा 14 वर्षांचा होता.तर मुलगी ही 10 वर्षांची होती. दोन्ही मुलांचे काही दिवसांपूर्वी थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. मुलांच्या अकाली मृत्यूमुळे झालेला आघात सहन न झाल्याने  त्यांनी नैराश्यामधून आत्महत्या केली.

Father commits suicide after death of two children in a row