शेतकऱ्यांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखला; तीस गावांच्या अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आक्रमक


विशेष प्रतिनिधी

बीड : अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता.
अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजरसुंबा महसूल मंडळातील तीस गाव अनुदानापासून वंचित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलीय. Farmers block Dhule-Solapur highway; Aggressive for overgrown grants of thirty villages



दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते सामील झाले होते. जवळपास अर्धा तास या महामार्गावरील वाहतुक रोखल्याने औरंगाबाद आणि अंबाजोगाईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. महसूल मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास हे आंदोलन थांबवण्यात आले असले तरी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Farmers block Dhule-Solapur highway; Aggressive for overgrown grants of thirty villages

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”