वृत्तसंस्था
पिंपरी : कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपये मदत म्हणून देण्याचा निर्णय पिंपरी- चिंचवड पालिकेने घेतला आहे. प्रत्येक कुटुंबीयांना अर्थसाहाय्य म्हणून महापालिका २५ हजार रुपये देणार आहे. परंतु, यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे वय पन्नास वर्षे असावे,अशी अट होती. ही अट रद्द करावी, अशी मागणी स्थायी समितीत केली. त्यास मंजुरी दिली आहे. families those dieled by corona will get 25 thousand : pimpri chichvad corporation
कै. मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे होते. शहरातील सुमारे पावणेचार हजार नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत्यू झालेल्यांना पंचवीस हजारांची मदत देता येते. मात्र, त्यासाठी पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी ही मदत होती. त्यामुळे अनेक नागरिक मदतीपासून वंचित राहत होते.
सदस्या भीमाताई फुगे यांनी मदतीसाठी वयाची अट रद्द करावी,अशी मागणी केली. त्याला सर्व सदस्यांनी अनुमोदन देत यामधील निधन व्यक्तींच्या वयाची अटच रद्द करावी, अशी मागणी केली. त्यानंतर सदस्यांची ही मागणी आयुक्त राजेश पाटील यांनी मान्य केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App