कोरोना लसीच्या बनावट प्रमाणपत्रांचा धुळ्यात सुळसुळाट ; शिवसेनेची कारवाईची मागणी


विशेष प्रतिनिधी

धुळे – कोरोना काळातील संकटात धुळे मनपा आरोग्य विभागाने चारशे ते पाचशे रुपये घेऊन जवळपास आठ ते दहा हजार लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे.Fake anti-corona vaccination certificates in Dhule; Shiv Sena demands action

महापालिकेतील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करून शिवसेनेने आज धुळे महापालिकेच्या गेट समोर तीव्र आंदोलन केले.लस न देता चारशे ते पाचशे रुपयात नकली प्रमाणपत्र देणे म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार धुळे महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी करीत आहे,



असा गंभीर आरोप शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी केला. राज्य शासनाने व केंद्र शासनाने सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना, प्रवास करताना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाना सर्वांना लस देण्याची जबाबदारी दिली आहे.

परंतु धुळे महापालिकेने गैरफायदा घेत नकली प्रमाणपत्र विकण्याचा धंदा सुरू केला आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांनी केला आहे. या कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये झालेला भ्रष्टाचार तातडीने बाहेर काढावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

Fake anti-corona vaccination certificates in Dhule; Shiv Sena demands action

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात