FADANVIS PRESS: आज फुटणार फडणवीसांचे फटाके ! 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स…अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष…


  • दुपारी बारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉईंटला पत्रकार परिषद FADANVIS PRESS: Fadnavis firecrackers will explode today! Press conference at 12 o’clock … Only Maharashtra’s attention 

विशेष प्रतिनिधी

मुंबई:विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं.

आर्यन खान प्रकरणावरून NCB वर आणि भाजपवर नवाब मलिक यांनी विविध आरोप केले. त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद असणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.नरीमन पॉईंट या ठिकाणी असलेल्या भाजप कार्यालयात 9 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

1 नोव्हेंबरला काय म्हणाले होते फडणवीस?

दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आवाज नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. जो फोटो त्यांनी ट्वीट केला आहे, त्याबद्दल रिव्हर मार्चच्या लोकांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. ती व्यक्ती क्रिएटिव्ह टीमने हायर केलेली होती, असं त्यांनी म्हटलेलं आहे.

चार वर्षांपूर्वीचा फोटो आज सापडला आहे. ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी हे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांसोबत फोटो काढलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला.

यापाठीमागे त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात रिव्हर मार्चवाल्यांनीच त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते लोक रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले होते. त्यांच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही’

FADANVIS PRESS: Fadnavis firecrackers will explode today! Press conference at 12 o’clock … Only Maharashtra’s attention

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती