कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कन्नडसक्तीवर ठाम


विशेष प्रतिनिधी

बंगळूर – उच्च शिक्षणात कन्नड विषय सक्ती करण्याच्या विषयावर फेरविचार करण्यास उच्च न्यायालयाने सांगितले असतानाच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कन्नडसक्तीवरील निर्धार कायम ठेवला आहे. कर्नाटक सरकार केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येच नव्हे, तर पदवीस्तरीय वर्गांमध्येही कन्नडसक्ती करण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवेल, असे त्यांनी सांगितले.kanada compulsion is must in Karnataka – CM

‘कन्नडक्कगी नावू’ (आम्ही कन्नडसाठी) या राज्यव्यापी मोहिमेदरम्यान नुकतीच लाखो लोकांनी राज्यातील अनेक भागात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कन्नड गाणी गायली. माताड माताड कन्नड’ (कन्नड बोला) या घोषवाक्यासह १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्योत्सवाच्या निमित्ताने ही मोहीम सुरू आहे.



कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले जे मातृभाषेला महत्त्व देते. केवळ प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणातच नव्हे तर पदवी स्तरावरही कन्नडसक्ती करण्याचा अध्यादेश आम्ही आणला होता. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात आहे. त्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे.

kanada compulsion is must in Karnataka – CM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात