Fadanavis Police Inquiry : विधानसभेत गृहमंत्री वळसे-पाटील बचावात्मक; फडणवीस पुन्हा आक्रमक!!, मला आरोपीसारखेच प्रश्न विचारले!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस बदल्या घोटाळ्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल झालेली पोलीस चौकशी आज विधानसभेत पुन्हा एकदा गाजले.Fadanavis Police Inquiry dilip walase patil

ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिलेले उत्तर आज पुन्हा विधानसभेत तसेच दिले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रिव्हिलेज आहेत याची सरकारला जाणीव आहे. देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून कोणतीही नोटीस पाठवण्यात आली नव्हती. तर त्यांना प्रश्नावली पाठवण्यात आली होती आणि पोलिसांनी घरी जाऊन त्यांचा जबाब घेतला. हा विषय इथेच संपवावा, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.


शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा ; इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार , दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही


– फडणवीसांचे सभागृहात उत्तर

पण त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरोपी म्हणूनच पोलिसांनी काल प्रश्न विचारले. साक्षीदार म्हणून प्रश्न विचारले नाही. आपण गोपनीयता कायद्याचा भंग केला आहे असे तुम्हाला वाटत नाही का?, हा प्रश्न साक्षीदाराला विचारण्यात येत नाही पण तो प्रश्न पोलिसांनी मला विचारला होता. याकडे फडणवीस यांनी सभागृहाचे आणि दिलीप वळसे पाटील यांचे लक्ष वेधले.

– केंद्रीय गृहसचिवांना राज्य सरकारची विनंती

विरोधी पक्ष नेत्यांकडे जी काही माहिती आहे, ती त्यांनी केंद्रीय गृह सचिव यांना दिली आहे. राज्य सरकारने देखील केंद्रीय गृहसचिवांकडे संबंधित माहिती राज्य सरकारच्या तपास अधिकार्‍यांना द्यावी अशी विनंती करणारे पत्र पाठवले आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कोणत्या प्रकारची चौकशी करायची ती करा. त्याला आडकाठी आणण्याचे कारण नाही. परंतु मला पाठवले आधी पाठवलेल्या प्रश्नावलीत आणि नंतर प्रत्यक्ष विचारलेल्या प्रश्नांमध्ये गुणात्मक फरक होता. आधीची प्रश्नावली आणि नंतरची प्रश्नावली यातला गुणात्मक फरक कोणी केला या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्याच्यातही मला पडायचे नाही. ही कायदेशीर लढाई आहे. ती आम्ही लढू. माझ्या वडिलांना गंगाधरपंत फडणवीस यांना इंदिराजींनी दोन वर्षे कोणत्याही गुन्हा शिवाय तुरूंगात ठेवले होते. माझ्या काकूंना शोभाताई फडणवीस यांना 18 महिने तुरुंगात ठेवले होते. त्यामुळे आम्ही तुरुंगाला घाबरणारी माणसे नाहीत. आम्ही संघर्ष करू आणि भ्रष्टाचार बाहेर काढू, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरे – पवार सरकारला दिला.

– व्हिसल ब्लोअर एक्ट

व्हिसल ब्लोअर ऍक्ट मला विरोधी पक्षनेता अथवा आमदार म्हणून प्रिव्हिलेज वापरायचा नाही हे मी आधीच सांगितले आहे. परंतु, पोलीस बदल्यांमध्ये खाल्लेला पैसा हे प्रकरण भ्रष्टाचाराचे असल्याने व्हिसल ब्लोअर एक्ट खाली सर्वसामान्य माणूस म्हणून देखील मला संरक्षण आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Fadanavis Police Inquiry dilip walase patil

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात