प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस बदली घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गेल्या शुक्रवारी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडून महाविकास आघाडीच्या सरकारचा जो पर्दाफाश केला, त्यावरून सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी अखेर राजीनामा दिला आहे. ही माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली.Fadanavis Pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan resigns; Home Minister Dilip Walse’s information in the Legislative Assembly; But refuses to hand over investigation to CBI
वळसे पाटलांचा बचावात्मक पवित्रा
फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील हे पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात दिसले. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली मात्र त्यावरूनही विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही.
फडणवीस इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी
दिलीप वळसे पाटील यांनी तुम्ही फडणवीस इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी काढली आहे काय?, असा खोचक सवाल वळसे-पाटील यांनी केला. फडणवीस यांनी दिलेल्या पेन ड्राईव्ह निश्चित तपास करण्यात येईल. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार नाही, असे आश्वासन वळसे-पाटील यांनी दिले. पण त्याच वेळी हे सर्व प्रकरण राज्य सरकारची आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याने ते सीबीआयकडे सोपवावे, ही फडणवीस यांची मागणी मात्र ठाकरे – पवार सरकारने फेटाळून लावली आहे.
न्यायालयात जाणार
सरकारने सीबीआय चौकशीची ही मागणी फेटाळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग केला आहे. त्याचबरोबर पोलीस बदल्या प्रकरणात सर्व पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाऊन ही चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दोषींना शासन करू
तत्पूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत अतिशय छोट्या स्वरूपात फडणवीसांच्या आरोपांचे उत्तर दिले सरकार कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही वाचण्याचा प्रश्न नाही विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सर्व पुराव्यांची छाननी सरकार करेल आणि चौकशीअंती दोषी व्यक्तींना शासन करेल असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले. मात्र संबंधित पोलीस बदली घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे त्यांनी नकार दिला त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App