Maharashtra Budget 2022 : मुंबई तुपाशी, गडचिरोली उपाशी!! पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या मुंबईला 130 % निधी, एकनाथ शिंदेंच्या गडचिरोलीला 17 % निधी!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने मोठा भेदभाव केला आहे. “ज्याची आहे ताकद, त्याला दिलीय मदत आणि  ज्याची कमी ताकद कमी त्याला ठेवला उपाशी,” अशी आहे अर्थसंकल्पाची स्थिती, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पाचे वाभाडे काढले.Maharashtra Budget 2022 : aditay thackeray mumbai got 130 % allocation, eknath shinde gadchiroli got 17% allocation

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आहेत म्हणून मुंबई शहराच्या निधीत 130  % वाढ केली आहे, तर गडचिरोलीसाठी 17 % वाढ केली आहे, या मुद्द्यावरून फडणवीसांनी ठाकरे – पवार  सरकारवर जोरदार शरसंधान साधले.राष्ट्रवादीचा जादा निधीवर हात

फडणवीस म्हणाले की राज्याचा अर्थसंकलप 5 लाख 48 हजार कोटींचा आहे. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांना 3 लाख 17 हजार कोटी देण्यात आलेत, काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 44 हजार कोटी आणि शिवसेनेच्या खात्यांना फक्त 90 हजार 181 कोटी  देण्यात आले आहेत, जिथे पगार जास्त द्यावा लागतो ती खाती राष्ट्रवादीकडे नाहीत, तर काँग्रेसकडे आहेत, तरीही अर्थमंत्री अजित पवारांनी सर्वाधिक निधी मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांनाच दिला आहे

ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प जुनाच

मी मुख्यमंत्री असताना राज्याची अर्थव्यवस्था ही ट्रिलयन डॉलर करण्याची संकल्पना मांडली होती, तेव्हाचे विरोधक जे आजचे सत्ताधारी आहेत, त्यांनी माझा उपहास केला, मात्र तिच संकल्पना आज अर्थमंत्र्यांनी स्वीकारली, आमच्या अनेक गोष्टी आधी नाकारल्या होत्या, आता ते स्वीकारत आहेत, असे सांगत पंचसूत्री विकासाची थीम घेतली हे चांगलेच आहे,

मात्र त्या अर्थसंकल्पात अशा कुठल्याच योजना दिसल्या नाहीत. अर्थसंकल्पात सध्या चालू असलेल्या योजना, आमच्या काळातील योजना यांचाच  उल्लेख आहे. या सरकाराला मद्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू, असा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आर्थिक बेशिस्तीवर नेमके बोट

राज्य सरकारने वर्षभर निधी उपलब्ध करून दिला नाही आणि ३१ मार्च या एक दिवसांत मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, मागील वर्षी ३१ मार्चला ३१ टक्के निधी दिला गेला. एक दिवसात इतका खर्च होतोच कसा, हे आर्थिक बेशिस्तीचे निदर्शक आहे, असाही आरोप फडणवीस यांनी केला.

Maharashtra Budget 2022 : aditay thackeray mumbai got 130 % allocation, eknath shinde gadchiroli got 17% allocation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था