GREAT INDIA: स्टीव्ह वॉने मित्राची शेवटची इच्छा केली पूर्ण ! हिंदू मान्यतेनुसार अस्थिचं वाराणसीत विसर्जन…


ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ  वाराणसीत आले होते . दिवंगत मित्राला दिलेल्या वचनानुसार हिंदू रीतिरिवाजानुसार अस्थीचे विसर्जन करण्यासाठी ते आले होते. 


विशेष प्रतिनिधी

वाराणसी : ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार स्टीव्ह वॉचा  एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे .  स्टीव्ह वॉ काही वर्षांपूर्वी वाराणसीत आले होते . आणि त्यांनी आपल्या मित्र ब्रायन च्या अस्थिकलशाचे हिंदू रितीरिवाजांनुसार गंगेत विसर्जन केले. GREAT INDIA: Steve Waugh Friend’s Last Wish Fulfilled! According to Hindu mythology, immersion of bones in Varanasi …

वास्तविक, स्टीव्ह वॉचे मित्र ब्रायन, जे मोची म्हणून काम करायचे, त्यांच्या कुटुंबात कोणीही नव्हते. सिडनीच्या ब्रायनची शेवटची इच्छा होती की त्यांची अस्थिकलश बनारस येथील गंगेत हिंदू विधीनुसार विसर्जित करण्यात यावं. हे वचन पूर्ण करण्यासाठी वॉ भारतात आले. आम्ही तुम्हाला सांगतो की वॉ अनेक धर्मादाय संस्थांशी संबंधित आहेत आणि सामाजिक कार्य करत राहतात.

स्टीव्ह वॉ यांना हिंदू धर्माबद्दल आपुलकी राहिली आहे. क्रिकेटमधून १३ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली असली तरी स्टीव्ह वॉ सतत भारतात ये-जा करतात. २००९ मध्ये स्थापन केलेल्या स्टीव्ह वॉ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतात. मात्र यावेळी स्टीव्ह वॉ यांची भारत भेट वेगळ्या कारणासाठी होती. आपल्या जवळच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वाराणसी गाठलं. मृत्यूनंतर त्याच्या अस्थिंचं विसर्जन गंगा नदीत केलं.

“माझ्या हातून पुण्यकर्म घडावं अशी इच्छा होती आणि त्याचबरोबर वाराणसीला भेट द्यायची होती. यात खूप आध्यात्मिक भावना आहे. ब्रायनच्या अस्थि विसर्जन करण्याचं पुण्यकर्म माझ्याकडून घडलं. याचा मला मनापासून समाधान वाटत आहे. त्याचे जीवन खूप खडतर होते आणि त्याला कुटुंब नव्हते. गंगेत अस्थिविसर्जन करावं ही त्यांची शेवटची इच्छा होती. त्याच्यासाठी काहीतरी केल्याबद्दल मला खूप समाधान वाटत आहे.,” असं स्टीव्ह वॉने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.

GREAT INDIA: Steve Waugh Friend’s Last Wish Fulfilled! According to Hindu mythology, immersion of bones in Varanasi …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था