Fadanavis pendrive Bomb : केंद्रीय तपास यंत्रणांवरचे शरद पवारांचे आरोप सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनीच फेटाळले!!; कसे ते वाचा!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला टाकले सगळे रेकॉर्डिंग हे सरकारी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपाशिवाय होणे शक्य नाही. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर बोट ठेवले होते. मात्र, आज चार दिवसांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी “अचानक” प्रकट होऊन शरद पवार यांचे ते आरोप अप्रत्यक्षपणे फेटाळून लावले आहेत. Fadanavis pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan refutes Sharad Pawar’s allegations against Central Investigation Agency !!; How to read it !!

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातले व्हिडिओ रेकॉर्डिंग देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह मध्ये आहे. संबंधित रेकॉर्डिंग हे जळगाव मधील एक आरोपी तेजस मोरे याने भिंतीवरच्या घड्याळात छुपा कॅमेरा बसवून केले होते, असा खळबळजनक दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. इतकेच नाही तर आरोपी तेजस मोरे याला तुरुंगात असलेल्या इतर आरोपींची देखील साथ असल्याचा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे. या आरोपींच्या केसेस प्रवीण चव्हाण सरकारी वकील म्हणून लढवत आहेत. त्या आरोपींनी स्टींग ऑपरेशनमध्ये तेजस मोरेला साथ दिल्याचा दावा प्रवीण चव्हाण यांनी एबीपी माझाला दिलेल्या सुपर एक्सक्लूसिव मुलाखतीत केला आहे.



त्यामुळे अर्थातच शरद पवार यांचा केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपातून स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा स्वतः सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आज फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टिंग ऑपरेशनच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी देखील प्रवीण त्यांनी केली आहे. भाजपचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात पुरावे आहेत म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे असा दावाही प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

– जळगाव कनेक्शनचा दावा

स्टिंग ऑपरेशन करणारा तेजस मोरे हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे तो आपला आशील आहे आणि त्याने आपल्याला भिंतीवरचे घड्याळ भेट म्हणून दिले होते. त्या घड्याळ यातच छुपा कॅमेरा बसवला होता आणि त्यातून हे शूटिंग करण्यात आले आहे. यामुळे या स्टिंग ऑपरेशन मधले जळगाव कनेक्शन उघड होत आहे, असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.

– 4 दिवस “गायब”, आज “प्रकट”

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आठ मार्च रोजी विधानसभेत सायंकाळी पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला. त्या दिवशी सायंकाळी प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ते “गायब” झाले.

– 1 मोदी बाग – हिरवाई

दुसऱ्या दिवसापासून अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण कार्यालयाला कुलूप होते. प्रवीण चव्हाण हे पुण्यामध्ये 1 मोदी बाग जवळ असलेल्या हिरवाई बिल्डिंग मध्ये राहतात. 1 मोदी बाग हे हा शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाचा पत्ता आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रवीण चव्हाण नेमके कोठे आहेत?, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते 4 दिवस “गायब” राहिले आणि आज “अचानक” त्यांनी एबीपी माझा समोर “प्रकट” होऊन आपली बाजू मांडली.

– वळसे पाटलांचे उत्तर का लांबले?

  • देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांवर सरकार पक्षातर्फे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी 9 मार्चला उत्तर देतील, असे सांगण्यात आले. परंतु, त्यांनी बुधवारी उत्तर दिले नाही. त्यादिवशी भाजपने नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्चात भाजपचे सगळे आमदार सामील झाले होते.
  • – त्यानंतर 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल होते. त्यामुळे त्या दिवशी देखील दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांच्या आरोपावर विधानसभेत उत्तर दिले नाही.
  • – काल 11 मार्च रोजी महाराष्ट्राचे बजेट विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडले. त्यामुळे देखील दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांच्या आरोपाला उत्तर दिले नाही. काल 11 मार्च रोजी सायंकाळी राजकीय बैठकांच्या सिलसिल्याला वेग आला. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये “महत्त्वाची” बैठक झाली. बैठकीला जयंत पाटील उपस्थित होते. महाविकास आघाडीचे दोन मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशिष शेलार हे देखील राज्यपालांना भेटून आले.
  • काल सायंकाळच्या “वेगवान” राजकीय घडामोडींनंतर आज 12 मार्च रोजी सकाळी सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे एबीपी माझा समोर एक्सक्लुझिव्हली प्रकट झाले आणि त्यांनी आपली बाजू मांडली. यात त्यांनी शरद पवार यांनी सरकारी यंत्रणांवर केंद्रीय तपास संस्थांनी स्टिंग ऑपरेशन केले असावे, हा आरोप अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला. आता प्रवीण चव्हाण “प्रकट” झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे कोणते उत्तर देतात?, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Fadanavis pendrive Bomb: Public Prosecutor Praveen Chavan refutes Sharad Pawar’s allegations against Central Investigation Agency !!; How to read it !!

महत्त्वाच्या बातम्या

काश्मिरात जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी ठार खोऱ्यात आज पहाटे पासून चकमक सुरू

निलेश राणे म्हणाले, मराठा अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पण नवाब मलिकांचा घेतला नाही, म्हणून शरद पवारच दाऊदचा माणूस आहे की काय अशी शंका

Fadanavis pendrive Bomb : “गायब” सरकारी वकील प्रवीण चव्हाण 4 दिवसांनी एबीपी माझा समोर “प्रकट”; रेकॉर्डिंग मॅनिप्युलेशनचा केला दावा!!

माजी क्लास वन ऑफीसर आणि ज्येष्ठ लेखकावर पंढरपुरात मागण्याची वेळ

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात