पालघरच्या तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या जाखरिया लिमिटेड कंपनी या वस्त्र निर्मिती कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन एका मजुराचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आगीची तीव्रता आणि जखमींची स्थिती पाहून मृतांचा आकडा वाढू शकतो. Explosion in textile factory of Palghars Tarapur, one worker died due to boiler explosion; four injured
वृत्तसंस्था
मुंबई : पालघरच्या तारापूर एमआयडीसीमध्ये असलेल्या जाखरिया लिमिटेड कंपनी या वस्त्र निर्मिती कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन एका मजुराचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आगीची तीव्रता आणि जखमींची स्थिती पाहून मृतांचा आकडा वाढू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील प्लॉट जे -1 मध्ये असलेल्या जाखरिया लिमिटेड या कंपनीमध्ये सकाळी 6 च्या सुमारास ही आग लागली आणि सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या पथकाने ती आटोक्यात आणली. सध्या आग विझविण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज सुमारे चार ते पाच किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. सुदैवाने सकाळी कारखान्यात फारसे लोक नव्हते, त्यामुळे मोठा अपघात टळला. सध्या कारखान्यात अडकलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
याच्या एक दिवस अगोदर, शनिवार, 4 सप्टेंबर रोजी, पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कापड कारखान्यात शनिवारी पहाटे झालेल्या स्फोटात दोन कामगार ठार आणि पाच जण जखमी झाले होते. ‘थर्मल फ्लुइड हीटर’मध्ये हा स्फोट झाला, ज्याचा वापर गरम थर्मल फ्लुईड कपड्यांना सुकविण्यासाठी केला जातो. सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथिलेश राजवंशी (34) आणि छोटेलाल सरोज (36) अशी मृतांची नावे आहेत. भाजल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला होता.
Explosion in textile factory of Palghars Tarapur, one worker died due to boiler explosion; four injured
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App