माजी खासदार कलमाडींच्या भावाच्या घरी चोरट्यांचा डल्ला


काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी 72 लाख 93 हजार ऐवज पळवून नेला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू श्रीधर कलमाडी यांच्या बाणेर येथील सदनिकेवर डल्ला मारून चोरट्यांनी 72 लाख 93 हजार 777 ‘रुपयांचा ऐवज चोरी केला. Ex MP Suresh Kalmadi Brother Shridhar Kalmadi house broken by Thieves

याप्रकरणी श्रीधर शामराव कलमाडी (वय.74,रा.बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी रात्री सायंकाळी सहा ते सात्री साडे दहाच्या सुमारास बाणेर रोड शामलाली सर्व्हे नंबर सहा फ्लॅट क्रमांक 39,40,48 या सदनिकेत घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काँग्रेेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे बंधू असून, त्यांचे साई सर्व्हिस नावाने गाडी विक्रीचे शोरुम आहे. तसेच इतरही व्यवसाय आहेत. रविवारी रात्री फिर्यादी व त्यांच्या पत्नी घर बंद करून त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या खिडकीची जाळी फाडून त्यातून हात घालून दरवाज्याची कडी काढली. त्यानंतर खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरुमधील कपाटात ठेवलेली 50 हजारांची रोकड व हिरे, मोती जडीत दागिणे असा किंमती ऐवज चोरी केला. फिर्यादी हे घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळगावे करीत आहेत.

Ex MP Suresh Kalmadi Brother Shridhar Kalmadi house broken by Thieves

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती