हत्या होईल तरीही आम्ही वचन तोडणार नाही, अटलबिहारी, जयप्रकाश नारायण यांचा वारसा, गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आमची हत्या होईल तरीही आम्ही हे वचन आम्ही तोडणार नाही. या देशात आणीबाणी लागली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण आणि नेल्सन मंडेला यांचा वारसा माझ्यासोबत आहे असा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ आणि एसटी संपकऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.Even if there is murder, we will not break our promise, Atal Bihari, Jaiprakash Narayan’s legacy, Gunaratna Sadavarte’s warning

गेल्या 18 दिवसांपासून तुरुंगात राहिलेले सदावर्ते यांची तुरुंगातून मंगळवारी सायंकाळी सुटका झाली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी लगेचच ‘हम है हिंदुस्थानी’ असे म्हणत सदावर्ते म्हणाले, ”माझी सुटका हा एसटी कर्मचाऱ्यांचा , देशातील समस्त कष्टकऱ्यांचा विजय आहे.



पाच महिन्यापासून एसटी संपकरी कामावर नाहीत त्यांच्या रोजी-रोटीचा सवालही महत्वाचा होता त्यामुळे जेलमधून मीच कष्टकऱ्यांना म्हणालो होतो की, कामावर जा!लिबर्टीवर न्यायालयाने भाष्य केले याचा मला एक वकील म्हणून आनंद आहे. सरकारला लिबटीर्चा किती अर्थ समजतो हे माहित नाही, पण कष्टक?्यांवर अन्याय करू नका हे मी आदरपुर्वक राज्य सरकारला सांगतो

असे सांगून सदावर्ते यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले, मला अटक झाल्यानंतर माज्या बाजूने अनेक लोक उभे राहीले. केंद्रातील मंत्री नारायण राणे यांनी सुड उगवत असल्याची टीका करीत आमची बाजू घेतली. त्याबद्दल त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी आभार. तेरा वर्षांची माझी मुलगी, पत्नी आणि माझे मित्र परिवार माझ्यासोबत होते. आमच्या सोबत देशातील हिंदुस्तानी कष्टकरी राहीले त्यांचे धन्यवाद .

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुणे पोलिसांकडून होणाºया अटकेपासून दिलासा मिळाला. सदावर्तेंवर पुणे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने ही विनंती मान्य करून त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांची आज सुटका करण्यात आली. सदावर्ते यांना नेण्यासाठी त्यांच्या पत्नी आणि वकील जयश्री पाटील या कारागृह परिसरात आल्या होत्या.

Even if there is murder, we will not break our promise, Atal Bihari, Jaiprakash Narayan’s legacy, Gunaratna Sadavarte’s warning

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात