केंद्राच्या मंजुरीआधीच गुगलकडून नामांतर, औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर, तर उस्मानाबादचा धाराशिव


प्रतिनिधी 

औरंगाबाद : उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोनच आठवड्यांत एकनाथ शिंदे सरकारनेही ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. तसेच दोन्ही सरकारांनी उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यावर शिक्कामोर्तब केले होते. आता आधी विधिमंडळाची व नंतर केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हे नाव सर्वत्र अधिकृतपणे वापरले जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच गुगलवर ‘औरंगाबाद’ सर्च केल्यास ‘संभाजीनगर’ असे नाव ठळकपणे दिसते. नामांतरविरोधी पक्ष, संघटनांनी त्याला आक्षेप घेतला आहे.Even before the approval of the Centre, Google changed its name, Aurangabad was mentioned as Sambhajinagar, while Osmanabad was mentioned as Dharashiv.

वाद पेटण्याची शक्यता

गेली 34 वर्षे औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. या काळात अनेक आंदोलने झाली, प्रकरण न्यायालयात गेले, एवढ्या दिवसांच्या संघर्षानंतर अखेर राज्य सरकराने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांनतर सुद्धा नामांतराला विरोध सुरुच आहे. याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. मात्र त्यापूर्वी गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावरून पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.



एमआयएमचा विरोध कायम

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर एमआयएमने मात्र, त्याला विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत शहराचे नाव बदलू देणार नसल्याची भूमिका एमआयएमने घेतली आहे. या निर्णयाच्या विरोधात एमआयएमने आणि काही संघटनांनी मोर्चा सुद्धा काढला होता.

खासदार जलील यांचा आक्षेप

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुगलच्या या धोरणावर तीव्र शब्दांत आक्षेप घेत ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, गुगलने आपल्या नकाशात औरंगाबादचे नाव कशाच्या आधारावर बदलले आहे, ते कृपया स्पष्ट करावे. ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा दुष्प्रचार खेळला जातोय, त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नामांतराला विरोध

खासदार जलील यांच्यासह नामांतरविरोधी समितीने औरंगाबादमध्ये या निर्णयाला यापूर्वीही विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे खासदार जलील यांनी पूर्वीही ट्विट करून औरंगाबादच्या नामांतराला तीव्र आक्षेप घेतला. 16 जुलै रोजी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, शिवसेना असो की, भाजप. या साऱ्यांनी स्वार्थी राजकीय फायद्यासाठी महापुरुषांची नावे वापरली. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी करणे हे त्याचे एक उदाहरण आहे. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीलाही या ऐतिहासिक शहराच्या नामांतराचे श्रेय हवे होते, असा टोला त्यांनी लगावला होता.

विकासाचीही गरज

जलील यापूर्वी 16 जुलैला केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हणतात की, हे पक्ष आता औरंगाबादच्या जनतेला दर आठ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार हे सांगू शकतील का? आता तरुणांना नोकऱ्या मिळू लागतील का? ते आमचे क्रीडा विद्यापीठही परत आणतील का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल? आमचे पासपोर्ट/आधार/पॅन/शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी कोणाचे शुल्क आकारले जाईल हेही सरकार कळवेल का! आज रस्त्यावर नाचणारे सगळे रांगेत उभे राहून ही कामे सर्वसामान्यांसाठी करून देतील का, औरंगाबादला केवळ नावाचीच नव्हे तर विकासाची गरज त्यांनी ट्विटमधून व्यक्त केलीय.

Even before the approval of the Centre, Google changed its name, Aurangabad was mentioned as Sambhajinagar, while Osmanabad was mentioned as Dharashiv.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात