दिल है छोटासा छोटीसी आशा : शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे हे शिवसेना नेतेच, उपनेते पदीही शिंदे गटातील आमदार कायम!!


प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करून शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपशी युती करत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापले. त्यानंतर राज्यात मोठे राजकीय घमासान होऊन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या पक्षातून हकालपट्टी केली. त्यांना शिवसेना गटनेते पदावरूनही हटविले. बाकीच्या आमदारांनाही शिवसेनेतून घरचा रस्ता दाखवला पण हे असताना देखील राजकीय आशा सुटत नाही असे म्हणतात ते खोटे नाही. त्यामुळेच की काय शिवसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर एकनाथ शिंदे आणि बाकीचे बंडखोर आमदार अजूनही शिवसेनेच्या नेतेपदावर उपनेते पदावर आणि मंत्रिमंडळातही “कायम” आहेत. Eknath shinde still Shivsena leader according to Shivsena official website

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा गट बनवला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली, त्यांना शिवसेना नेते पदावरून हटवले. असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी मनापासून ही कठोर कारवाई केली नाही, अशी शंका यावी, असेच चित्र दिसत आहे. कारण शिवसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर एकनाथ शिंदे अजूनही शिवसेना नेते म्हणून विराजमान आहेत.

एकनाथ शिंदेची हकालपट्टी तरी… 

एकनाथ शिंदे हे जेव्हा २० जून रोजी शिवसेनेतील २९ आमदार सोबत घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले, तेव्हाच शिवसेनेत खळबळ माजली होती, त्यानंतर पुढील २ दिवसांत शिंदे यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्यात आले, तसेच शिवसेना नेते पदावरूनही हटवण्यात आले. त्यानंतर ११ दिवसांनी थेट शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्यामध्ये स्वतः शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. सरकारने बहुमत सिद्ध करताना शिंदे गटाकडे एकूण ४० आमदार जमा झाले होते. अशा रीतीने आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ५५ पैकी अवघे १५ आमदार उरले आहेत. असे असले तरी शिंदे गटाने अद्याप उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य केले नाही. स्वतः उद्धव ठाकरे हे देखील अजूनही शिंदे गटातील आमदारांचा तिरस्कार करत नाहीत. म्हणूनच की काय शिवसेनेच्या संकेतस्थळावर शिवसेना नेत्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि नाव कायम ठेवण्यात आले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बंडखोर आमदार संजय राऊत यांच्या नावाने जरी भरपूर शिव्या घालत असले तरी संजय राऊत यांचे एक वक्तव्य विसरता येणार नाही शिवसेनेचे दरवाजे, खिडक्या, फटी सगळे उघडे आहे. पण तुम्ही परत या, असे ते म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य आजही कायम असल्याचेच शिवसेना मानत आहे, असे दिसून येत आहे.

उपनेते आणि प्रवक्तेही तेच 

तर उपनेतेपदी आमदार गुलाबराव पाटील, यशवंत जाधव, उदय सामंत ही शिंदे गटातील आमदारांची नावे कायम आहेत, तर प्रवक्ते पदी आमदार प्रताप सरनाईक यांचेही नाव कायम आहे.

मंत्रिमंडळही तेच! 

वेबसाईटवर मंत्रिमंडळही कायम आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, संजय राठोड, शंभूराज देसाई आणि अब्दुल सत्तार या शिंदे गटातील आमदारांची नावे जे आधी मंत्री म्हणून होते त्यांची नावेही कायम आहेत.

Eknath shinde still Shivsena leader according to Shivsena official website

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात