एकनाथ शिंदे बंड : खरे आव्हान आदित्य ठाकरेंपुढे युवा सेना पुन्हा उभे करण्याचे!!


प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मराठी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि त्यातून तयार होणारे पर्सेप्शन याच्या पलिकडे शिवसेनेत एक मोठे आव्हान उभे राहिले आहे ते म्हणजे आमदारांच्या फुटी बरोबरच छोट्या शहरांमध्ये तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये शिवसैनिकांमध्ये पटणारी फूट आणि तिला सांधण्यासाठी तयार करावे लागणारे शिवसैनिक हे फार मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आदित्य ठाकरे यांच्यापुढे आहे.Eknath Shinde Rebellion: The real challenge is to re-establish the youth army in front of Aditya Thackeray

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह 38 आमदारांनी बंड केल्यानंतर पुन्हा एकदा खऱ्या आणि खोट्या शिवसैनिकांची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उध्दव ठाकरे यांच्या गुळमुळीत धोरणामुळे आधीच शिवसेनेतला बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि उध्दव ठाकरे यांचे समर्थक असे दोन गट पडले असून त्यातूनच झालेल्या युवा सेनेच्या जन्मानंतर शाखाशाखांमधून जुन्या शिवसैनिकांसमोरच युवा सैनिकांचे आव्हान निर्माण झाले. त्यामुळे फुटलेल्या शिवसेनेनंतर जुन्या शिवसैनिकांवर अवलंबून न राहता आता आदित्यच्या युवा सेनेवरच शिवसेनेची मदार राहणार आहे.– युवा सैनिकांची फौज कशी तयार होणार?

शिवसेनेने भारतीय विद्यार्थी सेना बरखास्त करत युवा सेनेची स्थापना करत याचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवले. त्यानंतर युवा सेनेचा विस्तार करत युवा सेनेची कार्यकारणी, युवा अधिकारी, युवा शाखा अधिकारी, युवती अधिकारी, युवती शाखा अधिकारी आदींची नेमणूक करून मुंबईसह राज्यातील विविध जिल्हा, तालुक्यासह गावागावांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून युवा सेनेचा विस्तार केला. प्रत्येक शाखांमध्ये शाखाप्रमुखांच्या बरोबरीने युवा शाखाअधिकारी यांना बसवण्यात आले आणि महिला शाखा संघटकांसोबत युवती शाखा संघटकांची नेमणूक करुन शिवसेनेच्या समांतर पातळीवर युवा सैनिकांची टिम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कामांमध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि युवा सैनिकांना विशेष महत्व देण्यात आले. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांच्या बरोबरीने युवा सैनिकांची फौज तयार करण्यात आल्याने शाखाशाखांमधून धुसफूस पहायला मिळत होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भर पडली आहे.

युवा सेनेवर शिवसेनेची मदार

परंतु एकनाथ शिंदे यांनी ४० ते ४५ आमदारांना फोडून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर आता उध्दव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे जुन्या शिवसैनिकांवरील विश्वास उडाला आहे. शिवसेनेत बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक असल्याने भविष्यात आपला समर्थक शिवसैनिक तयार करण्यासाठी युवा सेनेची स्थापना करण्यात आली होती. आज शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर याच युवा सेनेवर शिवसेनेची मदार असून युवा सैनिकांच्या मदतीने शिवसेनेची पुढील वाटचाल करावी लागणार आहे.

– युवा सेनेला महत्व

युवा सेनेच्या शाखांमधील महत्वाच्या पदांवर युवा सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या वर्णी लावावी लागणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना घेऊन पुढे घेऊन जाण्याऐवजी आदित्यच्या युवा सेनेच्या सैनिकांना सोबत घेऊन शिवसेनेची पुढील वाटचाल करण्यावर आता शिवसेनेला भर द्यावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ही वेळ तुलनेने फार लवकर आली आहे आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व एस्टॅब्लिश होत असतानाच मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Eknath Shinde Rebellion: The real challenge is to re-establish the youth army in front of Aditya Thackeray

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था