अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती?


विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??, अशी स्थिती आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जाहीररित्या कितीही आक्रमक आव आणला, तरी दोन्ही पक्षांचे नेते प्रचंड अस्वस्थ आहेत आणि त्यातूनच त्यांना वर उल्लेख केलेली अस्वस्थतेची अवस्था आली आहे!! त्या अस्वस्थतेच्या अवस्थेतूनच ते विशिष्ट गाठीभेटी घेत आहेत किंवा गाठीभेटी घेण्याचा निदान प्रयत्न तरी करत आहेत. Eknath Khadse and Nana Patole said to be restless in NCP and Congress tried to meet BJP top leaders

भाजपचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशी या दोन अस्वस्थ नेत्यांची नावे आहेत.

खडसेंचा अमित शाहांची भेट घेण्याचा प्रयत्न

एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या गेल्या तीन-चार दिवसात माध्यमातून विविध अंगांनी येऊन गेल्या. खडसे हे अमित शाह यांच्या केबिन बाहेर तीन तास बसून राहिले. परंतु अमित शाह यांनी त्यांना भेट दिली नाही. त्यावेळी त्यांच्याबरोबर खासदार रक्षा खडसे या देखील होत्या. त्याचबरोबर अमित शहा यांची भेट झाली नसली तरी त्यांच्याबरोबर एकनाथ खडसे यांची फोनवरून चर्चा झाली, अशा बातम्या येऊन गेल्या. त्यानंतर आपण अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची केव्हाही भेट घेऊ शकतो, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केल्याचे समोर आले. या भेटींचा राजकीय अर्थ काढू नये असे त्यांनी वक्तव्य केल्याच्याही बातम्या आल्या.

पण एकूण एकनाथ खडसे हे त्यांच्या नव्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत, हेच या सर्व बातम्यांमधून दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्या पक्षात राहून काही मिळणार नाही, याची त्यांना जाणीव झाली आहे का?? इतकेच नव्हे तर एकनाथ खडसे यांच्या हवाल्याने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगूनही टाकले की खडसे साहेब म्हणाले आपण फडणवीसांबरोबर एकत्र बसू आणि बोलून काय असेल ते मिटवून टाकू!! ही बातमी जर खरी असेल तर खडसेंची अस्वस्थता निश्चित स्वाभाविक मानावे लागेल. आणि त्यांनी भेटीगाठी घेण्याचे केलेले प्रयत्न देखील स्वाभाविक मानावे लागतील.

नाना पटोले – फडणवीस बंद दाराआड चर्चा

जे एकनाथ खडसे यांच्या बाबतीत तेच नाना पटोले यांच्या बाबतीत नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपवर प्रचंड टीकास्त्र सोडत आहेत. मुळात भाजप सोडून काँग्रेसमध्ये येताना त्यांनी फडणवीसांवरच शरसंधान साधले होते. परवाच त्यांनी लम्पी रोगावरून अजब शोध लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लम्पी रोग असलेल्या नायजेरियातून चित्ते आणले. भाजपचा शेतकऱ्यांच्या विरोधातला हा डाव आहे, असा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सडेतोड उत्तर देखील दिले होते. परंतु जाहीररित्या झालेल्या वादविवाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या भंडारा दौऱ्यात त्यांच्याशी एकांतात चर्चा केल्याची बातमी बाहेर आली आहे.



फडणवीस भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी तेथे गेले होते. त्या बैठकीत एक आमदार म्हणून नाना पटोले सहभागी झाले होते. परंतु या बैठकीनंतर नानांनी फडणवीस यांची बाकी कोणीही अधिकारी नसताना एकट्यानेच भेट घेतली. बंद दराआड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या मुद्द्यावरून भंडारा जिल्ह्यात राजकीय तर्क विर्तकांना उधाण आले आहे. जाहीरपणे भाजपवर शरसंधान साधणारे नाना पटोले फडणवीसांची एकांतात भेट का घेतात??… त्यांच्या मनात नेमके काय चालू आहे??… अशी कोणती अस्वस्थता आहे??, की आपल्या राजकीय भवितव्यासाठी नाना पटोले आता वेगळा विचार करत आहेत??, अशा स्वरूपाचे हे तर्क वितर्क आहेत.

नाना अस्वस्थ का??

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. काँग्रेस संघटनेत जान फुंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु, त्यांनी आणलेले चैतन्य काँग्रेस नेत्यांची नौका 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पार करणार का??, ही ती अस्वस्थता आहे!! मग या राजकीय अस्वस्थतेतूनच नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे का??, हा प्रश्न पडतो आहे.

भाजपमध्ये पुन्हा घेतील??

एकूणच एकनाथ खडसे काय किंवा नाना पटोले काय??, आपापल्या पक्षात अस्वस्थ आहेत का?? आणि ते जुन्या ओढीने पुन्हा भाजपकडे बघत आहेत का?? हा प्रश्न आहे… अर्थात एक मुद्दा त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो म्हणजे खडसे आणि पटोले हे आपापल्या पक्षांमध्ये कितीही अस्वस्थ असले तरी आता एकदा बाहेर गेलेल्या त्यांच्यासारख्या नेत्यांना भाजपचे विद्यमान नेतृत्व पुन्हा पक्षात घेऊन त्यांना प्रस्थापित करेल का??… आणि म्हणूनच शीर्षकात विचारलेल्या प्रश्न संयुक्तित ठरतो आहे, अस्वस्थ गाठीभेटी वाढवतील का राजकीय प्रीती??

Eknath Khadse and Nana Patole said to be restless in NCP and Congress tried to meet BJP top leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात