नाना पटोले : राष्ट्रवादीशी पंगा घेऊन झाला; आता शिवसेनेशीही “बोलका” पंगा!!

नाशिक : विदर्भात सत्तेच्या गणितात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी राजकीय पंगा घेऊन झाला… आता शिवसेना नेत्यांशी पंगा घेणे सुरू आहे ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राजकीय स्टोरी आहे!! Nana Patole: Conflict with NCP; Now talk to Shiv Sena too !!

विदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना हिसका देताना स्थानिक पातळीवरची सत्ता भाजपबरोबर जुळवून घेतली. त्यामुळे संतापलेल्या नाना पटोले यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार प्रहार केले. राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला. पवार कुटुंबियांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दल मी बोलणार नाही. पण राष्ट्रवादीला आम्ही ठोस प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला होता.

या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी, आपली प्रत्यक्ष राजकीय कृती करून झाली आहे ना!!, मग उगाच “बोलका” वाद कशाला??, अशी सबुरीची बेरकी भूमिका घेतली!! नाना पटोले यांना त्यांच्याच भाषेत फक्त “बोलकी” उत्तर देण्याच्या फंदात अजित पवार आणि सुप्रिया सुळे पडले नाहीत. नानांनी टीका करूनही प्रत्यक्षात त्यांना विदर्भातील स्थानिक सत्ता राष्ट्रवादी आणि भाजप यांच्याकडून हिसकावून घेता आली नाही.

पण आता नाना पटोले यांनी राष्ट्रवादीशी पंगा घेऊन झाल्यानंतर शिवसेनेशी पंगा घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका काँग्रेसच्या ताब्यात होती, तेव्हा मुंबईची मुंबई झाली नव्हती, असा टोला त्यांनी नागपुरात बोलताना शिवसेनेला लगावला होता नानांच्या या वक्तव्याला पर्यावरणाची आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता निधी वाटपासंदर्भात बातमी आल्यानंतर नानांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या “राजकीय विषयास” हात घातला आहे. निधी वाटपाबाबत शिवसेनेचे आमदार गैरसमज पसरवत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, असे वक्तव्य नानांनी केले आहे.

राजस्थानच्या उदयपुर मध्ये चिंतन शिबिर झाल्यानंतर काँग्रेसला बाकीच्या राज्यांमध्ये गळती लागली आहे. गुजरात मधून हार्दिक पटेल, पंजाब मधून सुनील जाखड आणि हरयाणातून कुलदीप बिश्नोई हे पक्षाला सोडून गेले आहेत, तर नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना बरोबर “बोलका राजकीय पंगा” घेण्यात गुंतले आहेत.

पण आता नाना हे फक्त “बोलका पंगा” घेण्यापर्यंत थांबतात??, की त्याच्या पुढे जाऊन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना राजकीयदृष्ट्या डॅमेजिंग ठरेल, अशी काही कृती करतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Nana Patole: Conflict with NCP; Now talk to Shiv Sena too !!

महत्वाच्या बातम्या