नाशिकच्या सातपूर परिसरातून दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात , तब्बल २०० दारूचे बॉक्स जप्त


या ट्रकचा चालक कामीम इमरानउद्दीन अहमद आणि वाहनमालक दिपक गणपत रोकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.Eicher truck transporting liquor from Satpur area of ​​Nashik seized, 200 boxes of liquor seized


विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्रात दारूची बंदी असली तरी बऱ्याच दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होताना दिसत आहे.दरम्यान आज सातपूर परिसरातून दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागच्या वतीने ही करावाई करण्यात आली.

या ट्रकमधून तब्बल 200 दारूचे बॉक्स ताब्यात घेण्यात आले आहेत. ट्रक आणि दारूसाठा मिळून जवळपास तीस लाखांचा माल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.



दरम्यान या ट्रकचा चालक कामीम इमरानउद्दीन अहमद आणि वाहनमालक दिपक गणपत रोकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रकला पकडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ट्रॅप लावण्यात आला होता.त्यामुळे ट्रकला पकडण्यात अखेर यश आले. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या दारूवर राज्यात बंदी असून, हा साठा कुठून आणला? दारूचा साठा नेमका कुठे नेण्यात येणार होता, याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Eicher truck transporting liquor from Satpur area of ​​Nashik seized, 200 boxes of liquor seized

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात