नव्या उत्पादनशुल्क धोरणाच्या नावाखाली दिल्लीतील आप सरकारचा तरुणांना मद्यपी बनविणाचा निर्णय

नैतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या दिल्लीतील आम आदमी पक्षाने नव्या उत्पादनशुल्क धोरणाच्या नावाखाली तरुणांना मद्यपी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आता दारू पिण्याचे कायदेशिर वय २५ वरून २१ करण्यात आले आहे. यामुळे आता महाविद्यालयीन तरुणही बिनधास्त दारू पिऊ शकणार आहेत. The decision of the AAP government in Delhi to make the youth drunk under the name of new excise policy


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: नैतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या दिल्लीतील आम आदमी पक्षाने नव्या उत्पादनशुल्क धोरणाच्या नावाखाली तरुणांना मद्यपी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये आता दारू पिण्याचे कायदेशिर वय २५ वरून २१ करण्यात आले आहे. यामुळे आता महाविद्यालयीन तरुणही बिनधास्त दारू पिऊ शकणार आहेत.

साधारणत: २५ वर्षापर्यंत तरुण नोकरी-धंद्याला लागतात. त्यामुळेच कायदेशिरदृष्टया दारू पिण्याचे वय २५ आहे. मात्र, दिल्ली सरकारने आता हे वय २१ वर्षांपर्यंत कमी केले आहे. २१ ते २५ वर्षे वयाचे तरुण साधारणत: महाविद्यालयीन विद्यार्थी असतात. २१ वर्षांवरील तरुणांनी महाविद्यालयात मद्द पिले आणि ते कायदेशिर असल्याचे सांगितले तर काय करायचे असा सवाल करण्यात येत आहे.दिल्लीच्या अबकारी धोरणात केजरीवाल सरकारने बदल केले आहेत. सरकारने दारू पिण्याचे कायदेशीर वय 21 वर्षे पर्यंत कमी केले. 21 वषार्खालील तरुण दारू खरेदी करू शकणार नाहीत, त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. यासाठी आयकार्ड तपासणी आवश्यक असेल, असे मानभावीपणे म्हटले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, हे निर्णय दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाचा भाग आहेत. दिल्ली सरकार कोणत्याही नवीन दारूच्या दुकानांना मान्यता देणार नाही. नवीन उत्पादन शुल्क धोरण जारी करताना हे निर्णय घेण्यात आले आहेत. अज्ञात दारूची दुकाने दिल्लीत बंद ठेवली जाणार आहेत. त्याचबरोबर दारूच्या दुकानांसाठी नवीन नियम जाहीर केले जातील. दारूची तस्करी रोखण्याची योजना आहे. उत्पादन शुल्कात 20 टक्के वाढ होईल म्हणजे 1 ते 1000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. याद्वारे बनावट दारू रोखण्यासाठी दिल्लीत प्रथम आंतरराष्ट्रीय दजार्ची तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे, याचीही घोषणा केली गेली आहे.

नव्या उत्पादनशुल्क धोरणाला लोकहिताचा मुलामा देण्यात येत असला तरी उत्पादन शुल्कातून उत्पन्न वाढविण्याचाच हा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी तरुणांना मद्यपी बनविण्यात येणार आहे.

The decision of the AAP government in Delhi to make the youth drunk under the name of new excise policy

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*