राष्ट्रवादीचे माजी खजिनदार, माजी खासदार ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीचे छापे!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारवर ईडी सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी कितीही केला तरी ईडीची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खजिनदार माजी राज्यसभा खासदार ईश्वर बाबूजी जैन आणि माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांच्या जळगाव येथील प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्ससह अन्य काही ठिकाणी छापे घातले.ED raids Rajmal Lakhichand jewelers of NCP ex-treasurer, ex-MP Ishwar Jain!!

यामध्ये राष्ट्रवादीला होणारी फंडिंग तसेच अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवजांची चौकशी करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे ही कारवाई शरद पवारांच्या आर्थिक रसदीवर घाव घालण्यासाठी करण्यात आली काय??, अशी चर्चा सुरू झाली आहे.



ईडीने जळगावसह नाशिकमधील 6 कंपन्यांवर गुरुवारी सकाळी छापेमारी केली. पहाटे 4 पर्यंत या सर्वच ठिकाणी चौकशी सुरू होती. या चौकशीचा तपशील अद्याप स्पष्ट झाला नाही. पण कोणत्यातरी राजकीय कारणापोटी ही चौकशी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिल्याचे एका मराठी ऑनलाइन वृत्तपत्राने म्हटले आहे.

या कारवाईसाठी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांतून ईडी पथकाच्या 10 गाड्या गुरुवारी एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. या पथकांनी माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या जळगाव व नाशिक येथील एकूण 6 फर्म्सवर एकाच वेळी छापे घातले. संबंधित मालमत्ता आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. या प्रकरणी ईडीसह प्राप्तिकर विभागानेही चौकशी केली.

*600 कोटींच्या थकीत कर्जासंबंधी कारवाई

ईडीच्या या पथकात 60 अधिकारी – कर्मचाऱ्यांचा समावेश होता. चौकशी सुरू असताना ग्राहकांनाही आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. कर्मचाऱ्यांनाही आत येण्याची परवानगी नव्हती. स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या 600 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचाही दावा केला जात आहे.*

गतवर्षी डिसेंबर महिन्यातही सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती. त्यानंतर ईश्वर बाबूजी जैन यांनी थकीत कर्जापैकी फक्त 40 कोटींची रक्कम भरणा केली होती. त्यानंतर या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज कोणत्या मुद्यावर चौकशी सुरू आहे हे समजले नाही.

माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 वर्षे खजिनदार होते. त्यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांना पाठिंबा दिला आहे, पण त्यांचे चिरंजीव मनीष जैन यांनी अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागाही ईश्वर जैन यांच्याच नावाने आहे. त्यामुळे त्यांच्याकडील महत्त्वाचे दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हे दस्ताऐवज राष्ट्रवादी पक्षावरील दाव्याच्या कारवाईत महत्त्वाची ठरू शकतात, असेही सांगितले जात आहे. पण याबाबतचा कुठलाही अधिकृत खुलासा झालेला नाही.

ED raids Rajmal Lakhichand jewelers of NCP ex-treasurer, ex-MP Ishwar Jain!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात