म्हणे, राहुल गांधी अमेठीतून लढणार; पण वायनाड सोडून देण्याची “पोलिटिकल रिस्क” घेणार का??


नाशिक : केरळ मधील वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी आज जाहीर केले, पण त्यामुळे राहुल गांधी एकीकडे अमेठीतून लढताना दुसरीकडे वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडून देण्याची “पोलिटिकल रिस्क” घेणार का??, हा सवाल तयार झाला आहे. Rahul Gandhi may contest loksabha elections from amethi, but will he take a political risk to leave Waynaad??

राहुल गांधी यापूर्वी अमेठीचे दोन वेळा खासदार होतेच. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना अमेठीत पराभवाची धूळ चारली आणि त्या केंद्रीय मंत्री झाल्या. सध्या त्या अमेठीत अत्यंत प्रभावी खासदार म्हणूनच ओळखल्या जातात. त्याच लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले असले, तरी केरळच्या वायनाड मधून निवडून आले होते. दरम्यानच्या काळात काही महिन्यांसाठी त्यांची खासदारकी गेली होती. पण त्यांनी वायनाडचा संपर्क कमी केला नव्हता. काहीच दिवसांपूर्वी खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर ते वायनाडचा दौराही करून आले.

वायनाड हा असा मतदार संघ आहे, की जिथे देशातले बहुसंख्यांक हिंदू त्या मतदारसंघात अल्पसंख्यांक आहेत आणि देशातले अल्पसंख्यांक मुस्लिम तिथे बहुसंख्यांक आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बाब अधोरेखित करून सांगितली होती.

त्यामुळेच वायनाड हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय धोरणाच्या दृष्टीने राहुल गांधींसाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. निवडणुका आल्या की राहुल गांधी सॉफ्ट हिंदुत्वाची कास धरत टेम्पल रन करतात. पण काँग्रेसच्या धोरणात्मक बाबींमध्ये मात्र मुस्लिम हिताला विशेषत्वाने प्राधान्य देतात, ही बाब आता कुणाच्या नजरेआड राहिलेली नाही. त्यातूनच 2019 मध्येच ज्यावेळी खुद्द त्यांच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या अमेठीतला “राजकीय धोका” लक्षात आला होता, त्याच वेळी त्यांनी अमेठी बरोबर वायनाड मधूनही निवडणूक लढविण्याची राजकीय चातुर्य दाखविले होते. हे राजकीय चातुर्य त्यांच्या कामी देखील आले. अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला, तरी वायनाडच्या जनतेने त्यांना लोकसभेत पाठविलेच. म्हणूनच राहुल गांधी, अमेठीतून निवडणूक लढवताना वायनाड सोडून देतील की पुन्हा एकदा कोणतीही रिस्क न घेता तेव्हा आपल्यासाठी वायनाडचीच निवड करतील??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

परस्पर घोषणा गांधी परिवाराने ऐकल्यात का??

शिवाय इथे एक अन्य बाब देखील महत्त्वाचे आहे, ती म्हणजे उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी परस्पर राहुल गांधींची अमेठीतली उमेदवारी जाहीर केली आहे. अजय राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. उत्तर प्रदेश मध्ये ते काँग्रेसचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीतून उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या आशा अपेक्षा वाढल्या आहेत. पण त्यांनी परस्पर राहुल गांधींची उमेदवारी जाहीर करून टाकल्याने ते तसेच घडेल का??, हा मोठा सवाल आहे. काँग्रेस मध्ये गांधी परिवार अन्य कोणाचे ऐकतो का??, त्याचा दाखला इतिहासात मिळतो का??, हे सवाल देखील अजय राय यांनी राहुल गांधींच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केल्याने तयार झाले आहेत.

या सवालांच्या खऱ्या उत्तरातच राहुल गांधी अमोठीतून लढणार का?? आणि अमेठीतून लढले तरी वायनाड सोडून देण्याची “पोलिटिकल रिस्क” घेणार का??, या सवालांची उत्तरे मिळतील.

Rahul Gandhi may contest loksabha elections from amethi, but will he take a political risk to leave Waynaad??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात