आधी पटोले आता चव्हाणांचा ठाकरेंवर वार ; मविआत काँग्रेसला चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप, पक्षश्रेष्ठींना तक्रार करणार


प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस अस्वस्थ असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आता सरकारमधील मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला चांगली वागणूक मिळत नाही. आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत, त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.Earlier Patole now Chavans attack on Thackeray MVA accuses Congress of not getting good treatment

अशोक चव्हाण पुढे म्हणाले, आमच्याकडे अनेक तक्रारी आहेत. मागच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतो. पण, राज्यसभा निवडणुकीमुळे त्यावर सध्या तरी चर्चा झाली नाही.”मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसचे दिग्गज नेते महाविकास आघाडीत योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोप करत आहेत. सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले खरे, पण मागच्या काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस स्पष्टपणे जाणवत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच राष्ट्रवादीवर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला कमकुवत करत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे, असेही विधान त्यांनी केले होते.

आता नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळत असलेल्या वागणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे चर्चा केली नाही, पण आमच्या अनेक तक्रारी असल्याचे चव्हाण म्हणाले.

Earlier Patole now Chavans attack on Thackeray MVA accuses Congress of not getting good treatment

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था