कोरोनामुळे रेल्वेला ३६ हजार कोटी रुपयांचा तोटा, मालवाहतुकीने तारले, रावसाहेब दानवे यांची माहिती


विशेष प्रतिनिधी

जालना : कोरोनाकाळात रेल्वेला 36 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, या काळात मालवाहतुकीने रेल्वेला तारले. मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. सध्या निमार्णाधीन असलेल्या मुंबई-नागपूर द्रूतगती मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित केला जाईल,असेहीत्यांनी सांगितले.Due to corona railways loses Rs 36,000 crore

जालना येथील रेल्वेस्थानकावरील अंडरब्रिजच्या पायाभरणी सोहळ्यात दानवे बोलत होते. ते म्हणाले, प्रवासी रेल्वेगाड्या नेहमीच तोट्यात चालतात. तिकिटाचे दर वाढवल्यास त्याचा परिणाम प्रवाशांना होतो. त्यामुळे आम्ही ते कोरोनाकाळात करू शकलो नाही.



केवळ मालवाहतुकीतून रेल्वेला महसूल मिळतो. कोरोनाकाळात रेल्वेच्या मालवाहतुकीने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली असून, सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.बुलेट ट्रेनबाबत दानवे म्हणाले की, लोकांसाठी आवश्यक असल्याने हा प्रकल्प मुंबई-नागपूर द्रूतगती मार्गावर आणला जाईल. रेल्वेने पश्चिम मार्गिका समर्पित प्रकल्प हाती घेतला असून, या माध्यमातून नवी मुंबई आणि दिल्लीची जोडणी केली जाईल.

Due to corona railways loses Rs 36,000 crore

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात