वृत्तसंस्था
मुंबई : भारताचे माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोडगे रोहतगी हे आर्यन खानची ड्रग्जची केस मुंबई हायकोर्टात लढणार आहेत. आर्यन खानच्या दिमतीला बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याने प्रख्यात फौजदारी वकील सतीश माने शिंदे आधीच दिलेले आहेत. परंतु आर्यन खानची त्यांना जामिनावर सुटका करता आलेली नाही. आर्यन खान त्यामुळेच मुंबई हायकोर्टात गेला असून तेथे त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. Drugs on cruise ship case | I will appear for Aryan Khan in his bail matter today in Bombay High Court: Mukul Rohatgi, Former Attorney General of India
आता ही केस माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी हे लढवणार आहेत. मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टाकडे प्रख्यात वकील असून ते सन 2014 ते 2017 या कालावधीत भारताचे ॲटर्नी जनरल होते. रामजन्मभूमी केसच्या सुनावणीत देखील सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी यांचा महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. आता मात्र ते आर्यन खानची ड्रग्स प्रकरणाची केस मुंबई हायकोर्टात लढवणार आहेत.
Drugs on cruise ship case | I will appear for Aryan Khan in his bail matter today in Bombay High Court: Mukul Rohatgi, Former Attorney General of India (file photo) pic.twitter.com/Ry4dhslTlz — ANI (@ANI) October 26, 2021
Drugs on cruise ship case | I will appear for Aryan Khan in his bail matter today in Bombay High Court: Mukul Rohatgi, Former Attorney General of India
(file photo) pic.twitter.com/Ry4dhslTlz
— ANI (@ANI) October 26, 2021
आर्यन खान आत्तापर्यंत तीन वेळा खालच्या कोर्टात हजर झाला असून प्रत्येक वेळी त्याला विशिष्ट कारणांमुळे जामीन नाकारण्यात आला आहे. सध्या तो आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे मध्यंतरी शाहरुख स्वतः त्याची जेल मध्ये जाऊन भेट घेऊन आला आहे. मुकुल रोहतगी यांनी ही केस ताब्यात घेतल्यानंतर मुंबई हायकोर्ट आर्यन खानच्या जामीन अर्जावर कशा पद्धतीने सुनावणी घेते आणि त्याला जामीन मंजूर करते का?, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App