ड्रग्सचा पैसा देशविघातक ठरतोय ना… पण मग देश कोण चालवतेय? संजय राऊत यांचा खोचक सवाल


वृत्तसंस्था

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयी विजयादशमी मेळाव्यात देशात ड्रग्जच्या वाढत्या व्यसनावर चिंता व्यक्त केली आहे. ड्रग्जच्या व्यापारातून आणि तस्करीतून येणारा पैसा देशविघातक कारवायांसाठी वापरला जातो. ही तस्करी आणि व्यापार रोखला पाहिजे, असे वक्तव्य केले.  Drug money is anti-national … but then who is running the country? Sanjay Raut’s sharp question

यावरून शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला चिमटा काढला आहे. ड्रग्सच्या व्यसनाधीनते संदर्भात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली चिंता योग्यच आहे. ड्रग्जची तस्करी आणि व्यापार रोखला गेलाच पाहिजे. पण मग या देशात राज्यकर्ते कोण आहेत? ते काय करत आहेत? नोटबंदी झाल्यानंतर ड्रग्ज माफिया, दहशतवादी यांचे कंबरडे मोडेल. त्यांचा पैसा बंद होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते ना…!! मग तसे झाले का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी करून मोदी सरकारला चिमटा काढला आहे.

आजच सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी देशातल्या विविध प्रश्‍नांसाठी मोदी सरकारला जबाबदार धरून केंद्र सरकारच्या धोरणांचे वाभाडे काढले आहेत. शेतकरी आंदोलनापासून ते कोळसा टंचाई पर्यंत देशातल्या अनेक मुद्यांची चर्चा या अग्रलेखात केली आहे. त्यानंतर डॉ. मोहन भागवत यांच्या विजयादशमी मेळाव्यातल्या भाषणावर संजय राऊत यांनी टीका-टिपणी करून करू केंद्रातल्या मोदी सरकारला चिमटे काढले आहेत.

केंद्रात मोदींचे सरकार असताना सरसंघचालकांना ड्रग्स व्यसनाधीनते विषयी चिंता व्यक्त करावी लागते. तस्करीतून येणारा पैसा देशविघातक कारवायांसाठी कसा वापरला जातोय याचे वर्णन करावे लागते, हेच केंद्रातल्या मोदी सरकारचे कर्तृत्व “राजकीय कर्तृत्व” सिद्ध करते, अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

Drug money is anti-national … but then who is running the country? Sanjay Raut’s sharp question

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात