पोलीसांवर विश्वास ठेवून चालणार नाही, सीआयएसएफच्या संरक्षणाचे नियम पाळा, देवेंद्र फडणवीस यांचा किरीट सोमय्या यांना सल्ला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलिसांवर विश्वास ठेवून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सीआयएसएफच्या संरक्षणाचे नियम पाळा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.Don’t trust police, follow CISF protection rules, Devendra Fadnavis advises Kirit Somaiya

फडणवीस यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची त्यांच्या मुलुंड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली. किरीट सोमय्या यांच्या कोरलाई दौºयानंतर फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यासोबत या प्रकरणावर चर्चा केली.महाराष्ट्राची संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. महाराष्ट्र आपल्याला घोटाळे मुक्त करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. तसेच
किरीट सोमय्या म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घोटाळ्यांसंबधी चर्चा झाली. याशिवाय गेले काही दिवस माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत त्यावरही चर्चा झाली.

पुण्यानंतर काल कोरलईला देखील अधिकृत वेळ घेऊन गेलेलो असताना देखील शिवसेनेचे गुंड तेथे पोहचले कसे? त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की तुम्हाला सीआयएसएफ आणि मोदी सरकारने दिलेले सुरक्षेचे नियम पाळावे लागतील. पोलिसांवर खालच्या सुरक्षेवर विश्वास ठेवून चालणार नाही.

किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेची मान खाली गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:चं मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी स्वत:च्या पत्नीचे १९ बंगले गायब केले. महाराष्ट्राच्या जनतेची यामुळे मान झुकली. हा मुख्यमंत्री कसा?

एका रात्रीत बायकोचे १९ बंगले तोडले, गायब केले. बाकीच्या गुंडागर्दीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्था राखणे आहे. मात्र, शिवसेनेच्या दादागिरीसमोर प्रशासन देखील झुकत आहे.

Don’t trust police, follow CISF protection rules, Devendra Fadnavis advises Kirit Somaiya

महत्त्वाच्या बातम्या