विशेष प्रतिनिधी
मुंबई: सत्तेचा माज आला असे वागू नका. चर्चा करा. एसटी कर्मचारीही आपल्या महाराष्ट्राचे आहेत. परिवहन मंत्रीअनिल परब यांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही केव्हाही चचेर्ला तयार आहोत. कुंभकर्ण सहा महिने झोपत होता. तुम्ही बारा महिने झोपतात का, असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी केला आहे.Don’t pretend to be in power, talk to ST workers, warns Sudhir Mungantiwar
सुधीर मुनंगटीवार यांच्या काळात एसटीचं विलिनीकरण का केले नाही असा सवाल परब यांनी केला होता. यावर मुनगंटीवार म्हणाले, हा प्रश्न मला विचारण्याऐवजी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांना विचारायला हवा. त्यावेळी त्यांच्याकडे परिवहन हे खाते होते. एसटीचा प्रश्न मार्गी लावायचा असता तर त्यांनी मार्गी लावला असता. असा प्रस्ताव त्या वेळी एसटी विभागाच्या माध्यमातून टाकला होता का?
शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीपूर्वी जारी केलेल्या शपथनामामध्ये जे सांगितलं ते इतकं केलं तरी बास होईल. सत्तेचा माज आला असं वागू नका चर्चा करा, एसटी कर्मचारीही आपल्या महाराष्ट्राचे आहेत, असा इशारा मुनंगटीवार यांनी दिला. अनिल परब यांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही केव्हाही चचेर्ला तयार आहोत.कुंभकर्ण सहा महिने झोपत होता तुम्ही बारा महिने झोपतात का, असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी केला आहे.
पगारवाढीची मागणी सोडून सर्व मागण्या मान्य केल्यात. उरलेल्या मागण्यांबद्दल चर्चा करायची असेल तर संप मागे घ्यावा लागेल असे अनिल परब म्हणालेत. संप न्यायालयाने बेकायदेशीर ठरविल्याचेही ते सांगतात. उच्च न्यायालयात जनतेच्या कराच्या पैशातून वकील करायचा आणि जनतेला न्यायालयात टाकायचं हे चुकीच आहे.
न्यायालयाने जरी सांगितले असले तरी तुम्ही आज चर्चा करू शकता. उच्च न्यायालयाने बारा आठवड्यात प्रश्न सोडवायला सांगितलेला आहे. म्हणून 12 आठवडे वाट पाहायची असं गरजेच आहे का? तुम्ही कर्मचारी बांधवांना विश्वास द्या. त्यांना प्रेमाने साद घाला.
ते कर्मचारी तुमच्यासोबत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही निलंबित करु अशी धमकी देता. याद राखा एक दिवशी ही जनता तुमच्या सरकारला 1000 वषार्साठी निलंबित करेल, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App