वृत्तसंस्था
कोरोनाला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची भूमिका बजावते. ती वाढवण्यासाठी अनेक भाज्या मोलाची मदत करतात. त्या शेवग्याची भाजी तर कोरोनाच्या काळात वरदान मानली जाते. Do you want to boost the immune system? ; Then you need to eat drumsticks
शेवग्याच्या शेंगाच्या पानांची भाजी गोकुळाष्टमीला आवर्जून खाल्ली जाते. शेवग्याची कढी तर अप्रितम होते. शेवग्याच्या शेंगा चोखत खाण्याची जी मज्जा आहे ती अवर्णनीय. रोगप्रतिकाराक शक्ती वाढविण्यासाठी शेवग्याची भाजीचा जेवणात समावेश आवश्य करायला हवा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कोरोनाकाळात सी व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खाल्ले जातात. शेवग्याच्या शेंगामध्ये सी व्हिटॅमिन म्हणजेच क जीवनसत्व विपूल असते. तसेच पोटॅशियम, आयरन, मॅग्नीशियम, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, व्हीटॅमिन-ए आणि बी अशी पोषकतत्वे असतात. या सर्वांचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये होतो. अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मुतखड्याचा त्रास दूर होतो
शेवग्याचे सुप तसेच भाजी खाल्ल्यामुळे मुतखड्यापासून आराम मिळतो. त्यामुळे मुतखडा बाहेर शरीराच्या बाहेर पडतो, असा दावा केला जातो.
केस मजबूत होतात
शेवग्याच्या फुलांचा उपयोग केस चमकदार व मजबूत करण्यासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेवग्याच्या फुलांचा चहा केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.
डोकेदुखीचा त्रास कमी होतो
डोकेदुखीचा त्रास असेल तर शेवग्याची भाजी आवर्जून खा. यामुळे डोकेदुखीची समस्या चटकन दूर होईल.
सुज कमी, जखमा भरतात
शेवग्याच्या सेवनामुळे अवयवावर आलेली सूज कमी होते. तसेच याच्या पाल्याचे वाटण लावल्यास जखमा लवकर भरून येतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App