माजी सैनिक संघटनेच्या सभेत माजी सैनिकांच्या प्रश्नांवर चर्चा


विशेष प्रतिनिधी

पुणे : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना पुणे जिल्हा शाखेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. हुतात्मा सैनिकांच्या पत्नींचा आणि वीर नारींचा सत्कार करण्यात आला. Discussion of ex-servicemen’s questions at a meeting of the Ex-Servicemen’s Association

सैनिक लॉन्स ,घोरपडी येथे झालेल्या या वार्षिक सभेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाजीराव देशमुख, डॉ.प्रदिप सांबरे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,पुणे), उमाकांत भुजबळ (मंत्रालय), मारुती शिंदे (जिल्हा अध्यक्ष, राज्य शासकीय मध्यवर्ती कर्मचारी संघटना),पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश भिलारे, दीपक पाटील, शादिवान, दयानंद अनपट,तांदळे,गोडसे हे उपस्थित होते.उपाध्यक्ष जगन्नाथ लकडे, सचिव बाळासाहेब जाधव, निरंजन काकडे रविंद्र शेवाळे,नरेंद्र गायकवाड,कैलास गवळी,भूषण डावखरअनिल शिंदे,सचिन निगडे,राजपाल यादव,संदिप आहेर,विजय जाधव,संजय सुतार यांनी चर्चेत सहभाग घेतला.

८ वीर नारीना साडी-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. संघटनेमधील ज्या ५ सदस्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या पत्नीना भाऊबीज म्हणून साडी-श्रीफळ देण्यात आले. पदोन्नती प्राप्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

बाजीराव देशमुख यांनी पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या मागण्या संदर्भात शासनाकडे सुरु असलेल्या पाठपुराव्याबाबत सर्वांना माहिती दिली. तसेच, उपस्थित पुनर्नियुक्त माजी सैनिकांच्या आणि वीर पत्नींच्या तसेच,विधवांच्या समस्या जाणून घेवून,त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची हमी दिली. प्रकाश भिलारे यांनी जिल्ह्याचा अहवाल सादर केला व बाळासाहेब जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

Discussion of ex-servicemen’s questions at a meeting of the Ex-Servicemen’s Association

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती