ABG Shipyard Case : अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, एनडीए सरकारने एबीजी शिपयार्ड घोटाळ्यावर फार कमी वेळात कारवाई केली

ABG Shipyard Case Finance Minister Nirmala Sitharaman says NDA government has taken action against ABG Shipyard in a very short time

ABG Shipyard Case : एबीजी शिपयार्ड फसवणूकप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्रातील एनडीए सरकारने एबीजी शिपयार्ड फसवणूक प्रकरण फार कमी वेळात शोधून त्यावर कारवाई केली आहे. त्या म्हणाल्या की, एबीजी शिपयार्डचे खाते नोव्हेंबर 2013 मध्येच नॉन-परफॉर्मिंग अकाउंट (NPA) म्हणून घोषित करण्यात आले होते. एबीजी शिपयार्ड फसवणूकप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ABG Shipyard Case Finance Minister Nirmala Sitharaman says NDA government has taken action against ABG Shipyard in a very short time


वृत्तसंस्था

मुंबई : एबीजी शिपयार्ड फसवणूकप्रकरणी कारवाई करण्यात येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्रातील एनडीए सरकारने एबीजी शिपयार्ड फसवणूक प्रकरण फार कमी वेळात शोधून त्यावर कारवाई केली आहे. त्या म्हणाल्या की, एबीजी शिपयार्डचे खाते नोव्हेंबर 2013 मध्येच नॉन-परफॉर्मिंग अकाउंट (NPA) म्हणून घोषित करण्यात आले होते. एबीजी शिपयार्ड फसवणूकप्रकरणी कारवाई सुरू असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

एबीजी शिपयार्ड मुद्द्यावरून विरोधक सतत सरकारला घेरत आहेत, त्यानंतर अर्थमंत्र्यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, 2014 मध्ये आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी एबीजी शिपयार्डचे कर्ज खाते एनपीए झाले होते. हा मुद्दा उपस्थित करून विरोधक आपल्या पायावर कुऱ्हाड चालवत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून एबीजी शिपयार्ड फ्रॉडवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट केले होते की, ‘मोदीच्या काळात आतापर्यंत 5,35,000 कोटी रुपयांची बँक फसवणूक झाली आहे. 75 वर्षांत भारतातील जनतेच्या पैशांशी कधीही अशी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी चांगले दिवस आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनीही एबीजी शिपयार्डवर कारवाई करण्यासाठी एफआयआर नोंदवण्यास पाच वर्षे का लागली, असा सवाल केला आहे.

22,842 कोटी रुपयांची फसवणूक

देशातील सर्वात मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून 22,842 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

ABG Shipyard Case Finance Minister Nirmala Sitharaman says NDA government has taken action against ABG Shipyard in a very short time

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात