कमवित्या पत्नीला दरमहा दहा हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश; उत्पन्नातील तफावतीचा परिणाम


राहणीमानातील तफावतीमुळे नोकरी करून पगार मिळविणाऱ्या महिलेला दरमहा 10 हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश पुणे न्यायालयात झाला आहे. Diffrence between the salary of husband and wife pune court order alimony of १० thousand rupees to wife every month


विशेष प्रतिनिधी

पुणे : राहणीमानातील तफावतीमुळे नोकरी करून पगार मिळविणाऱ्या महिलेला दरमहा 10 हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश झाला आहे. याबरोबरच तक्रार अर्जाचा खर्च म्हणूनही पाच हजार रुपये देण्यात यावेत, असेही कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश आर.एस.आराध्ये यांनी आदेशात म्हटले आहे.

पत्नीने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तिने पतीकडून अंतरिम पोटगीची मागणी केली. ऍड. पुष्कर पाटील, ऍड. साजन महबुबानी आणि ऍड. अमित परदेशी यांच्यामार्फत तिने अंतरिम पोटगीची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यानुसार आता दोघांनीही उत्पन्नाच्या माहितीचे शपथपत्र न्यायालयात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पत्नी नोकरी करत असून, तिला दरमहा 32 हजार रुपये पगार आहे. तर पतीने दरमहा 25 हजार रुपये पगार असल्याची न्यायालयात माहिती दिली.राहणीमान, उत्पन्न यातील फरक आणि पती ऐशआरामाचे जीवन जगत असल्याने पत्नीने पोटगीची मागणी केली आहे. पतीच्या नावावर लाखो रुपयांच्या जमिनी आहेत. शिवय दोन महागड्या गाड्या आहेत. तसेच, त्याच्या आईची कंपनी आहे. त्यामध्ये तो कामाला असल्याचे दाखवत आहे. मात्र, वास्तविक तो त्या कंपनीत संचालक आहे. त्याचे राहणीमान उच्च असल्याचे पुरावे न्यायालयात दाखल करून पत्नीचे वकील ऍड. पुष्कर पाटील, ऍड. साजन महबुबानी आणि ऍड. अमित परदेशी य यांनी पोटगी देण्याची मागणी केली. या पुराव्यावरून पती न्यायालयाची दिशाभुल करत असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने पत्नीला दरमहा अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला.

Diffrence between the salary of husband and wife pune court order alimony of १० thousand rupees to wife every month

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था