अनिल देशमुखांना खरी क्लीनचिट?, की कागदपत्रे सोशल मीडियावर “फिरवण्याचा” खोडसाळपणा??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंट चालकांकडून शंभर कोटींची खंडणी वसूल केल्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआयने) खरीच क्लीनचीट दिली आहे की सीबीआयची कथित कागदपत्रे सोशल मीडियावर “फिरवण्याचा” खोडसाळपणा कोणी केला आहे?, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. Did Anil Deshmukh get clean chit by CBI in 100 cr extortion case?

अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही, असा दावा करणारी कागदपत्रे दोन दिवस सोशल मीडिया वरून “फिरवली” जात आहेत. सीबीआयचे तपास अधिकारी गुंजाळ यांनी अनिल देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा हा निष्कर्ष काढले असे म्हटले जात आहे. परंतु याबाबत कोणताही अधिकृत खुलासा सीबीआयने केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियात फिरवण्यात येणाऱ्या कागदपत्रांविषयी आणि त्यांच्या विश्वासार्हतेविषयी मोठी शंका उत्पन्न होते आहे.



राजकीय वर्तुळात मात्र या संदर्भात वेगळी चर्चा सुरू असून अनिल देशमुखांना 5 समन्स पाठवूनही सीबीआय किंवा ईडी त्यांना अजून अटक का करत नाही? त्यांच्याविरुद्ध खरच पुरावे सापडले नाहीत की ते दडवले गेलेत? अशा स्वरूपाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत सीबीआयकडून अधिकृत खुलासा आल्यानंतरच प्रकरणाचे गांभीर्य आणि अनिल देशमुख यांचा त्यातला सहभाग उघड होण्याची शक्यता आहे.

मात्र, ज्या कागदपत्रांची विश्वासार्हता शंकास्पद आहे अशा कागदपत्रांचा आधार घेऊन काही प्रसारमाध्यमांनी स्वतःच निष्कर्ष काढून सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

Did Anil Deshmukh get clean chit by CBI in 100 cr extortion case?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात