धनंजय मुंडे यांच्या लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मांचा पक्ष सर्व निवडणुका लढविणार


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या करुणा शर्मा यांचा पक्ष जिल्हा परिषदेपासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका लढविणार आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा करुणा शर्मा यांनी केली आहे.Dhananjay Munde’s live-in partner Karuna Sharma’s party will contest all elections

लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी जाहीर केले. करुणा शर्मा म्हणाल्या, जिथं जिथं पोटनिवडणूक असेल तिथं आमच्या पक्षाचा उमेदवार उभा असेल. कोल्हापूरमध्ये दोन-तीन लोकांशी आमचं बोलणं सुरु आहे.



यामध्ये उत्तम कागले, अजय देढे या सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच इतर दोन जण राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. पण या राजकीय व्यक्तींची नावाची घोषणा नंतर करण्यात येईल.आमच्या पक्षाची ध्येयधोरणं ज्यांना पटतील अशाच लोकांना आम्ही उमेदवारी देणार आहोत. जर आमच्या विचारांना अनुसरुन कोणी उमेदवार मिळालाच नाही तर मी स्वत:ही निवडणुकीला उभे राहिन.

आपल्या पक्षाची निवडणूक रणनीती काय असेल? हे सांगताना करुणा शर्मा म्हणाल्या, घराणेशाहीचं राजकारण संपवण हेच आमचं निवडणुकीचं धोरण आहे. त्यासाठी मला नव्या लोकांना संधी द्यायची आहे. आगामी नगरपालिका, झेडपी, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही आमच्या पक्षातर्फे लढवल्या जातील.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तर आम्ही संपूर्ण २८८ जागांवर निवडणूक लढवणार आहोत.शर्मा यांनी अहमदनगर येथे नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. ‘शिवशक्ती सेना’ असे त्यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव आहे.पक्षाची घोषणा केल्यानंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला आहे. त्यांनी माझ्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला आहे.

Dhananjay Munde’s live-in partner Karuna Sharma’s party will contest all elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात