राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात आपका क्या होगा गाण्यावर ठेका धरला.Dhananjay Munde’s dance on the song ‘Aapka Kya Hoga’ at his niece’s wedding
विशेष प्रतिनिधी
लातूर -राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात आपका क्या होगा गाण्यावर ठेका धरला.
धनंजय मुंडे यांच्या भाचीचे नुकतेच लग्न झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी एका हिंदी गाण्यावर डान्स केला असून त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. लातूरमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे हिचे लग्न होते. या लग्नासाठी धनंजय मुंडे सकाळपासूनच उपस्थित होते. हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले.
दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईंसोबत हजेरी लावली. विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत एका गाण्यावर ठेका धरला. धनंजय मुंडे डान्स करत असल्याचं पाहून उपस्थितही यावेळी त्यांच्यासोबत डान्स करत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App