शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक होती, फडणवीसांनी सांगितल्याचा विक्रम गोखले यांच्या दाव्याने खळबळ

वृत्तसंस्था

पुणे: शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले नाही, ही चूक होती, असे फडणवीस यांनी सांगितले,असे सांगून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले खळबळ उडवून दिली आहे. Devendra fadnavis said, that was my mistake, says vikram gokhale

पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले म्हणाले, शिवसेना-भाजपला एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला. त्यावर चूक झाली असे फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला.

एकट्या फडणवीसांची चूक

खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत, असं ते म्हणाले. मी तोंड दाबण्याने बांधून घेत नाही. त्यामुळेच मी कोणत्याही राजकीय पक्षांना बांधिल नाही. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश बिदेश झुगारुन देतो, असंही त्यांनी सांगितलं.

मोदी आदर्श नायक

मोदी जेव्हा देशासाठी उभं राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. जाणीवपूर्वक डोकी जागेवर ठेवून काम करा. पुन्हा माझी प्रामाणिक इच्छा आहे. की भाजप-शिवसेनेने एकत्रं आले तर फार बरं होईल,.

कंगनाच्या विधानाचं समर्थन

अभिनेत्री कंगना रणावतच्या विधानाचं समर्थन केलं. कंगना म्हणाली की, भीक मागून स्वातंत्र्य मिळालं. तिच्या म्हणण्यावर मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी वाचवलं नाही. देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही ते म्हणाले.

Devendra fadnavis said, that was my mistake, says vikram gokhale

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात