Loksatta Opinion Poll : आपत्तीच्या काळात राज्यातील मुख्यमंत्री ठाकरे यांची कामगिरी सुमार असल्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम करूनच कारभार हाकल्याची टीका होत आहे. दुसरीकडे, आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांकडूनही या टीकेला उत्तर देण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरोखरच सक्षम आहेत की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काम चांगले होते? या समाजमाध्यमांवर रंगत असलेल्या चर्चांवरून ‘लोकसत्ता‘ने ऑनलाइन पोल घेतला होता. या पोलमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरशी मिळवली आहे. Devendra Fadnavis Is Still First Choice Of Maharashtra Voters As CM, Loksatta opinion Poll Results
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. याच काळात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्याही जास्त आहे. याकाळात कोरोना टेस्ट, ऑक्सिजन, जीवनावश्यक औषधे, तौकते चक्रीवादळ या सर्व संकटादरम्यान राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने सत्ताधरी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. आपत्तीच्या काळात राज्यातील मुख्यमंत्री ठाकरे यांची कामगिरी सुमार असल्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम करूनच कारभार हाकल्याची टीका होत आहे. दुसरीकडे, आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांकडूनही या टीकेला उत्तर देण्यात येत आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खरोखरच सक्षम आहेत की माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काम चांगले होते? या समाजमाध्यमांवर रंगत असलेल्या चर्चांवरून ‘लोकसत्ता’ने ऑनलाइन पोल घेतला होता. या पोलमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सरशी मिळवली आहे.
लोकसत्ता डॉट कॉमने 24 तास कालावधीसाठी ट्विटरवर ऑनलाइन पोल घेतला. या पोलमध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्याल? असा प्रश्न जनसामान्यांना विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव टाकले होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये टफ फाइट दिसून आली. पोलमध्ये चार लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी आपलं मत नोंदवलं. या पोलमध्ये अत्यंत चुरस दिसून आली, कधी फडणवीसांचे, तर कधी ठाकरेंचे पारडे जड होताना दिसले. काही वेळा तर पोलचा तराजू ५० टक्क्यांच्या आसपास रेंगाळला. तथापि, सरतेशेवटी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली.
#LoksattaPoll: मुख्यमंत्री म्हणून माझी पसंती#Devendrafadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP — LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2021
#LoksattaPoll:
मुख्यमंत्री म्हणून माझी पसंती#Devendrafadnavis #UddhavThackeray #Shivsena #BJP
— LoksattaLive (@LoksattaLive) May 23, 2021
पोलमध्ये सहभागी एकूण संख्या : 5 लाख 29 हजार 249 देवेंद्र फडणवीस यांना मिळालेली मते : 2 लाख 79 हजार 443 उद्धव ठाकरे यांना मिळालेली मते : 2 लाख 49 हजार 806
देवेंद्र फडणवीस यांना 52.8 टक्के मते मिळाली. उद्धव ठाकरे यांना 47.2 टक्के मते मिळाली.
लोकसत्ता डॉट कॉमने घेतलेल्या या जनमत चाचणीत माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी बाजी मारली. 52 टक्के मतदारांनी त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. आघाडी सरकारचा आतापर्यंत एकूण कारभार, कोरोनादरम्यानचं व्यवस्थापन, विद्यमान मुख्यमंत्र्यांची कामगिरी, आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, या सर्व बाबींचाही परिणाम मतदानावर झाला हे उघड आहे.
(पोल : साभार लोकसत्ता डॉट कॉम)
Devendra Fadnavis Is Still First Choice Of Maharashtra Voters As CM, Loksatta opinion Poll Results
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App