आसाममध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा; नागालँड सीमेवर जवानांचे सर्च ऑपरेशन


वृत्तसंस्था

गोहत्ती : आसाम राज्यात सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आसाम रायफल्स आणि आसाम पोलिसांना यश आले आहे. दिमासा नॅशनल लिब्रेशन आर्मीवर (डीएनएलए) ही कारवाई केली होती. Seven Naxals killed in Assam

नागालॅण्डच्या सीमेवर पश्चिम कारबी अंगलोग जिल्ह्यात ही कारवाई झाली. आसामच्या कारबी अंगलोग जिह्यात डीएनएलएचे नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सर्च ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार जवानांवर केला.



प्रति उत्तरात यामध्ये सात नक्षली ठार झाले असून दोन गंभीर जखमी झाले. जवानांनी चार एके-47 रायफल आणि स्फोटके जप्त केल्याचे जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रकाश सोनोवाल यांनी सांगितले. दिमासा नॅशनल लिब्रेशन आर्मी आदिवासींचा स्वतंत्र देश बनवण्यासाठी काम करत आहे. त्याचा प्रमुख नाईसोदाओ दिमासा तर सचिव खारमिनदाओ दिमासा आहे. दरम्यान, डीएनएलएच्या नक्षलवाद्यांनी 19 मे रोजी येथील तरुणाची हत्या केली होती.

Seven Naxals killed in Assam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात