WATCH : शर्जिल उस्मानीने भारतमातेला शिव्या घातल्या तेव्हा यांनी शेपट्या टाकल्या, आता मात्र अख्खी पोलीस फोर्सच मागे लावलीय!; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Action On Narayan Rane In Press Conference

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात सेना-भाजपमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या वादावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, शर्जिल उस्मानीने भारतमातेला शिव्या घातल्या तेव्हा यांनी शेपट्या टाकल्या, तो अद्याप मोकाट आहे. इथे मात्र अख्खी पोलीस फोर्सच मागे लावली आहे. वासरू मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्यच आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Action On Narayan Rane In Press Conference


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात सेना-भाजपमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या वादावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, शर्जिल उस्मानीने भारतमातेला शिव्या घातल्या तेव्हा यांनी शेपट्या टाकल्या, तो अद्याप मोकाट आहे. इथे मात्र अख्खी पोलीस फोर्सच मागे लावली आहे. वासरू मारलं तर गाय मारण्याची सरकारची भूमिका अयोग्यच आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राणे साहेबांच्या वक्तव्याचे समर्थन नाही, पण पक्ष त्यांच्या पाठीशी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुळात राणे साहेब बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. पण मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिन विसरतात तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे. फडणवीस पुढे म्हणाले की, एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करू शकत नाही. एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

नाशिक पोलीस आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का?

फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केलीय, मला आश्चर्य वाटतंय, शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो, हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता आणि आज मात्र अख्खं पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी आलंय. एक पोलीस पथक नाशिकहून, एक पुण्याहून निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेन्स नाही, मी आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं. ते स्वत:ला छत्रपती समजतात का? की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा. कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला. मुळात हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल.

शर्जिल उस्मानीसमोर शेपट्या टाकल्या

फडणवीस पुढे म्हणाले की, अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने सरकार पोलिसांचा वापर करत आहे, मला वाटतं पोलीसजीव सरकार आहे. प्रत्येकवेळी कोर्टाकडून चपराक बसत आहे. अर्णवपासून कंगनापर्यंत सर्व ठिकाणी चपराक बसल्या. हे जे चालू आहे ते योग्य नाही. मी सल्ला देतो, कायद्याने काम करा, बेकायदेशीरपणे काम करणारे पोलीस सध्या कुठे आहेत, ते मी सांगण्याची गरज नाही. एकाच ऑफेन्सला तीन-तीन गुन्हे दाखल होतात, ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा, पुन्हा सांगतोय राणे साहेबांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण सरकार पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे ते पाहता भाजप राणेसाहेबांच्या पूर्ण पाठिशी आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

आमच्या कार्यालयावरील हल्ला सहन करणार नाही

शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करू. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही!

फडणवीस म्हणाले, अवैधपणे राणे साहेबांना अटक झाली तरी जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही आणि आमच्यावर कारवाई. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. ही जी कारवाई आहे ती अयोग्य आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असा पुनरुच्चार फडणवीसांनी केला.

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt Over Action On Narayan Rane In Press Conference

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात