Pakistan Imran Khan PTI Leader Neelam Irshad Sheikh on Live TV says Taliban will give Us Kashmir from India

WATCH : पाकिस्तानी नेत्यांनी तोडले अकलेचे तारे, इम्रान खान यांचे निकटवर्तीय म्हणाले- ‘तालिबान आम्हाला भारताकडून काश्मीर जिंकून देणार!’

Pakistan Imran Khan PTI Leader : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्याने पाकिस्तानमध्ये आनंदाचे ‘वातावरण आहे. पाकिस्तानी नेत्यांच्या वक्तव्यांवरून हे स्पष्ट दिसत आहे. या भागामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या पीटीआयच्या एका नेत्याने काश्मीरबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. यावरून पाकचा कुटील डाव उघड झाला आहे. पीटीआय नेत्या नीलम इर्शाद शेख यांनी म्हटले की, पाकिस्तान तालिबानच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. Pakistan Imran Khan PTI Leader Neelam Irshad Sheikh on Live TV says Taliban will give Us Kashmir from India


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्याने पाकिस्तानमध्ये आनंदाचे ‘वातावरण आहे. पाकिस्तानी नेत्यांच्या वक्तव्यांवरून हे स्पष्ट दिसत आहे. या भागामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या पीटीआयच्या एका नेत्याने काश्मीरबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. यावरून पाकचा कुटील डाव उघड झाला आहे. पीटीआय नेत्या नीलम इर्शाद शेख यांनी म्हटले की, पाकिस्तान तालिबानच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे.

नीलम इर्शाद शेख यांनी तालिबान भारताकडून काश्मीर जिंकून पाकिस्तानला देईल, असे वादग्रस्त विधान केले आहे. इम्रान यांच्या पक्षाच्या नेत्या नीलम यांनी एका पाकिस्तानी वाहिनीवरील चर्चेदरम्यान हे वादग्रस्त विधान केले. नीलम म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये इम्रान सरकार आल्यानंतर देशाचा मान वाढला आहे.

त्यांनी दावा केलाय की, तालिबानने म्हटले आहे की, ते आमच्यासोबत आहेत आणि ते आम्हाला काश्मीर जिंकून देतील. त्याच वेळी जेव्हा अँकरने नीलमला विचारले की तुम्हाला काश्मीर देऊ असे कोणी सांगितले? यावर नीलम म्हणाल्या, ‘भारताने आम्हाला विभागले, आम्ही पुन्हा एकत्र येऊ. आमचे सैन्य मजबूत आहे. सरकारकडे सत्ता आहे. तालिबान आमच्यासोबत आहे. पाकिस्तानने त्यांना पाठिंबा दिला आणि आता ते आम्हाला देतील.”

पाकिस्तानी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने जाहीर कार्यक्रमात असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. इतके दिवस ज्याचा फक्त अंदाज व्यक्त केला जात होता ती बाब आता खरी होताना दिसत आहे. तालिबानला पोसण्यात आणि मदत करण्यात पाकिस्तान आणि आयएसआयचाच हात असल्याचे यावरून उघड होते.

Pakistan Imran Khan PTI Leader Neelam Irshad Sheikh on Live TV says Taliban will give Us Kashmir from India

महत्त्वाच्या बातम्या