नाशिकमध्ये भाजपच्या बंद कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक; काचा फोडल्या


वृत्तसंस्था

नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये जो राजकीय तणाव निर्माण झालाय, त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा बिनघोर सुरू असून त्यांचे चिपळूणात भव्य स्वागतही करण्यात आले. पण तिकडे मुंबईत आणि नाशकात जोरदार राडा झाला आहे. Shiv Sena workers pelt stones at BJP party office in Nashik & raise slogans against Union Minister Narayan Rane.

नाशिकमध्ये शिवसैनिकांनी सकाळी एकत्र जमून भाजपच्या रिकाम्या असलेल्या कार्यालयावर जोरदार दगडफेक करून शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांचा उल्लेख कुटुंबप्रमुख म्हणून करीत होते. नारायण राणे यांच्या बैलाला… वगैरे घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या काचा फुटल्या. पण या वेळी ते कार्यालय बंद होते. तेथे कोणीही हजर नव्हते.

दरम्यान, नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानासमोर युवा सेनेचे सैनिक आणि भाजपमधील नारायण राणे यांचे समर्थक कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. पोलीसांना लाठीमार करावा लागला. यात एक पोलीस जखमी झाला.

Shiv Sena workers pelt stones at BJP party office in Nashik & raise slogans against Union Minister Narayan Rane.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात