खाद्यतेलाला महागाईची फोडणी, किमतीत २० टक्क्यांनी वाढ; डाळींच्याही किमती भडकल्या


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इंधन दरवाढीने नागरिक हैराण झाले असताना आता खाद्यतेलाच्या आणि डाळींच्या वाढलेल्या किमतीने सामान्यांचं कंबरडं मोडले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाचे भाव २० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमतीमुळे खाद्यतेल आणि डाळींच्या किमती वाढल्या आहेत, असे भारतीय उद्योग मंडळाने सांगितले.  Edible Oil inflation rises to 20 per cent; Pulses prices alao skyrocketed

एकीकडे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली असताना दुसरीकडे डाळीच्या किंमतीमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली. दिल्लीच्या किरकोळ बाजारपेठेत डाळीच्या किमतीमध्ये विक्रमी वाढ झाली.

खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये १५ ते २० रुपयांची वाढ

दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली. लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले होते. तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली. त्यात मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने आता आयातीवरील कर कमी केले तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च पण वाढला आहे.

लॉकडाऊनमुळे बेरोजगार, वेतन कपात झालेल्या नागरिकांना महागाईचे चटके बसत आहेत. महागाईवर कोणाचे नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशीच मागणी सर्वसामान्य करत आहेत. इंधन दरवाढ, आयातीवरील कर आणि कमी उत्पादन या कारणांमुळे किराणा मालाचे भाव वाढल्याचं व्यापारी सांगत आहेत. मात्र दुसरीकडे पुन्हा लॉकडाऊन होईल ? या भिती आणि अफवेमुळे तर महागाई भडकली नाही ना ? अशीही शंका व्यक्त होत आहे.

Edible Oil inflation rises to 20 per cent; Pulses prices alao skyrocketed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात